Madhurani Prabhulkar New Home : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेत एक सर्वसामान्य गृहिणी ते स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी राहणाऱ्या तसेच आर्थिकरित्या सक्षम झालेल्या अरुंधतीचा प्रवास दाखवण्यात येत आहे. या मालिकेत सध्या अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांकडूनही या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यातच आता या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरने तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नवीन घर खरेदी केले आहे.
मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिच्या आयुष्यातील अनेक घटनांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत असते. त्यातच आता मधुराणी प्रभुलकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. मधुराणी प्रभुलकरने नवीन घर खरेदी केले आहे. तिने तिच्या नव्या घराची झलकही एका व्हिडीओतून दाखवली आहे.
“मुंबईत आपलं स्वतः चं घर असावं, आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न… ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आंनद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे. आज मन कृतज्ञतेने भरून आलंय. आई वडिलांचे आणि सर्व थोरा मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा, आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ ह्यामुळेच हे स्वप्न साकारलंय….!!! सविनय व सादर आभार”, असे मधुराणी प्रभुलकरने म्हटले आहे. त्यासोबत तिने homesweethome असा हॅशटॅगही दिला आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला मधुराणी ही एका गाडीतून उतरुन इमारतीत जाताना दिसत आहे. तिच्यासोबत तिची मलुगीही तिचे नवीन घर पाहण्यासाठी आली आहे. यावेळी या दोघीही चावी घेत नवीन घराचे दार उघडताना दिसत आहे. त्यानंतर त्या दोघींनीही हॉल, बेडरुम, किचनचीही झलक दाखवली आहे. तसेच मधुराणीच्या नवीन घरात प्रशस्त खिडक्या, सुर्यप्रकाश आणि खेळती हवाही पाहायला मिळत आहे. सध्या मधुराणीच्या या व्हिडीओवर अनेक चाहते तसेच तिचे सहकलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर अनेकांनी तिला खूप खूप शुभेच्छा, फारच छान असे म्हणत कमेंट केली आहे.