पैसे देऊन प्रेक्षक आणतात, रिॲलिटी शोमध्ये ‘या’ गोष्टी लागतातच; माधुरी पवारने सांगितलं धक्कादायक वास्तव

| Updated on: Jun 23, 2024 | 8:06 PM

Actress Madhuri Pawar On Reality Show : अभिनेत्री माधुरी पवार हिने रिॲलिटी शोमधील वास्तव सांगितलं आहे. एका मुलाखती दरम्यान माधुरीने रिॲलिटी शोबाबतची माहिती सांगितली आहे. रिॲलिटी शोमध्ये तिला आलेले अनुभव माधुरी पवारने सांगितले आहेत. वाचा सविस्तर.....

पैसे देऊन प्रेक्षक आणतात, रिॲलिटी शोमध्ये या गोष्टी लागतातच; माधुरी पवारने सांगितलं धक्कादायक वास्तव
माधुरी पवार, अभिनेत्री
Image Credit source: Instagram
Follow us on

रिॲलिटी शो कसे चालतात? त्यांचं गणित कसं असतं? यावर अभिनेत्री माधुरी पवार हिने एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलंय. एकटी ऑडिशन द्यायला गेले. तेव्हा थोडा वेगळा अनुभव आला. चांगला परफॉर्मन्स देऊनही माझी निवड झाली नाही. त्यांनी मला सांगितलं की, तुमचा डान्स चांगला नाही झाला. पण मला वाटत होतं की माझा डान्स चांगला झाला आहे. तेव्हा विचार केल्यावर लक्षात आलं की माझ्याकडे स्टोरी नाहीये… रिॲलिटी शोमध्ये सध्या स्टोरी लागते. मग मी कशी साध्या घरातून आली आहे. किती खडतर प्रवास केला आहे आणि आता कशी मला संधी मिळाली, असा सगळा कंटेन्ट रिॲलिटी शोला लागतो. तो माझ्यात त्यांना दिसला नाही. त्यामुळे त्यांनी मला नाकारलं असावं, असं माधुरीने सांगितलं.

“रिॲलिटी शोमध्ये ‘या’ गोष्टी लागतातच”

आता जाऊन मला लक्षात आली की, रिॲलिटी शोमध्ये सध्या स्टोरी लागते. स्ट्रगल लागतो. जो तुमच्या चॅनेलचा टीआरपी वाढवेन. त्यामुळे सध्या रिॲलिटी शोमध्ये भावनिक स्टोरी लागतेच. तशी स्टोरी तुमच्याकडे असेल तर त्या स्पर्धकाला चांगला परफॉर्मन्स चांगला करता नाही आला तरी तो त्या स्पर्धेत पुढे जातो. हे या रिॲलिटी शोचं वास्तव आहे पण मला माझा प्रवास हा स्ट्रगर वाटत नाही. मला वाटतं की तो संघर्ष नाही तर आयुष्यातली मजा आहे. मला त्यात इमोशनली ते मांडता आलं नाही आणि मुळात मला तसं ते मांडायचं देखील नव्हतं, असं माधुरी पवार हिने या मुलाखतीदरम्यान सांगितलं.

तेव्हा वास्तव कळालं- माधुरी

एका रिॲलिटी शोमध्ये मी गेले. मला वाटलं की मी खूप चांगला डान्स केला आहे. पण मला वाटलं की, मी एवढा चांगला परफॉर्मन्स केला. पण मला तिथं सिलेक्ट नाही केलं गेलं. मग मला प्रश्न पडला की मला का सिलेक्ट केलं गेलं नाही. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा रिअॅलिटी शो केला तेव्हा मी ग्रुपमध्ये होते. तिथे मला काही वाटलं नाही. तिथं मला चांगला अनुभव आला होता. पण जेव्हा मी एकटी या स्पर्धेत उतरले तेव्हा मला तिथलं वास्तव कळालं, असं माधुरीने म्हटलं.

रिॲलिटी शोमधले प्रेक्षकही पैसे देऊन आणलेले असतात. कारण त्या कार्यक्रमात दिवसभर बसून राहायचं असतं तर या लोकांना पैसे दिले जातात. मग टाळ्या वाजवायला सांगितल्या की ते टाळ्या वाजवतात, असं माधुरीने सांगितलं.