मुंबई | 04 जानेवारी 2024 : एखाद्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं असेल तर सुरुवातीचा काळ अत्यंत खडतर असतो. काम मिळवण्यापासून ते त्या कामातील बारकावे शोधण्यापर्यंत सगळ्याचसाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. कलाकारांच्या बाबतीतही असंच होतं. अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा नवे कलाकार येतात. तेव्हा त्यांनाही हाच अनुभव येतो. प्राजक्ता माळी हितं नाव जरी आता मोजक्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जात असलं तरी प्राजक्ताचा हिचा सुरुवातीचा स्ट्रगलचा काळ खडतर होता. प्राजक्ता पुण्यात राहत होती. त्यामुळे सुरूवातीच्या काळात शुटिंगसाठी तिला पुणे ते मुंबई असा प्रवास करावा लागायचा. याबाबत एका मुलाखतीदरम्यान प्राजक्ता माळीने भाष्य केलं आहे.
सुरुवातीला प्राजक्ता एसटीने प्रवास करायची. FY ला असताना प्राजक्ता गुड मॉर्निग महाराष्ट्र हा कार्यक्रम होस्ट करत होती. प्राजक्ता तिच्या आईसोबत पुणे ते मुंबई असा प्रवास करावा लागयचा. भल्या पहाटे प्राजक्ता एसटीने प्रवास करायची. मुंबईत ही बस तिला सायनला सोडायची. मग तिथून रिक्षाने प्राजक्ता तिच्या सेटवर जायची. तिथे दिवसभर शूट करायची. त्यानंतर रात्री 10, साडे 10 ला चेंबूरला जायची. तिथून आईसोबत एसटीतून पुण्याला जायची. पुण्याला पहाटे तीन, चारला पोहचायची. तिथून टू व्हीलरवर घरी जायची. तेव्हा 25- 26 तासांचा दिवस असायचा. जवळपास अडीच वर्षे असा प्रवास करून तो शो होस्ट केला, असं प्राजक्ताने एका मुलाखतीत सांगितलं.
एकदा मी हट्ट केला की टॅक्सीने ऑडिशनला जाणार असा हट्ट केला. आईने तो पूर्ण केला पण पुढे दीड वर्ष तिने मला एसटीनेच मुंबईला नेलं. पुढे एसी बसने प्रवास केला. तेव्हा वाटायचं की वॉव मी एसी बसने प्रवास करतेय. खूपच भारी वगैरे वाटायचं, असं प्राजक्ताने सांगितलं.
जेव्हा मी सुवासिनी मालिका करायला लागले. तेव्हा मी आणि पप्पांनी निम्मे- निम्मे पैसे टाकून पहिली ऑल्टो कार घेतली. कारण तेव्हा सेट खूप आत होता. तिथून रिक्षा मिळायची नाही. त्यामुळे ही कार घेतली. तेव्हा मग मी मुंबईत राहात होते. तर त्या कारने प्रवास करू लागले, असं प्राजक्ता माळीने सांगितलं.