‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार प्रसिद्ध अभिनेत्री
Chala Hawa Yeu Dya and Nilesh Sable : अभिनेता निलेश साबळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून बाहेर पडला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार? याची चर्चा होतेय. अशातच आता चला हवा येऊ द्याच्या नव्या सूत्रसंचालकाचं नाव समोर आलं आहे. कोण आहे? वाचा सविस्तर...
1 / 5
मुंबई | 09 मार्च 2024 : 'चला हवा येऊ द्या' हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा लाखो चाहतावर्ग आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो. हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या कार्यक्रमात आता मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
2 / 5
गेली दहा वर्षे या कार्यक्रमाने महाराष्ट्राचं मनोरंजन केलं आहे. 'हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!' म्हणत डॉ. निलेश साबळे याने आपल्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना कार्यक्रमाशी जोडलं. पण आता निलेश साबळेने या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 5
निलेश साबळे याने कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार? हा प्रश्न चर्चेत आहे. याचं उत्तर आहे, अभिनेत्री श्रेया बुगडे... श्रेया आता या कार्यक्रमाची नवी सूत्रसंचालक असणार आहे.
4 / 5
श्रेया बुगडे ही 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे, अशी माहिती अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिली. तसंच कार्यक्रम बंद होण्याबाबत चॅनेलकडून आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
5 / 5
श्रेया ही आधीपासूनच 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात आहे. तिचा अभिनय अनेकांना भावतो. श्रेया आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतानाही दिसणार आहे. श्रेया आणि निलेश हे चांगले मित्र आहेत. निलेशनंतर श्रेया आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसेल.