मुंबई | 18 मार्च 2024 : अरूणिता कांजीलाल… हिला तुम्ही जरूर पाहिलं असेल. अरूणिता ही गायिका आहे. इंडियन आयडियलच्या 12 व्या सिझनमध्ये ती दिसली होती. तिच्या गायकीने अरुणिताने या शोमध्ये चार चांद लावले. केवळ 21 वर्षांच्या या तरूणीचे, तिच्या गाण्याचे लाखो फॅन्स आहेत. अरूणिताने गायलेल्या या गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळतात. सोशल मीडियावरही ती प्रचंड चर्चेत असते. पण रिॲलिटी शो गाजवणारी अरूणिता सध्या काय करते? कोणत्या रिॲलिटी शोमध्ये ती दिसते? अरूणिताबाबत जाणून घेऊयात…
अरूणिता कांजीलाल हिने इंडियन आयडियलचा 12 वा सिझन गाजवला. आता ती एका नव्या रिॲलिटी शोमध्ये दिसते आहे. सोनी टीव्हीवरच्या सुपस्टार सिंगर सिझन 3 मध्ये अरूणिता दिसते आहे. या कार्यक्रमातही तिला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळते आहे.
रिॲलिटी शो व्यतिरिक्त अरूणिता कांजीलाल हिची काही गाणीही रिलीज झाली आहेत. इंडियन आयडियलच्या 12 व्या सिझनमधील गायक पवनदीप याच्यासोबतही अरूणिताची काही गाणी रिलीज झाली आहेत. लव्ह नहीं तो क्या है? हे पवनदीप आणि अरूणिताचं गाणं काहीच दिवसांआधी रिलीज झालं. इतने पास हे गाणही तिचं रिलीज झालं. यात पवनदीपही दिसला आहे. जस दिल को हे देखील गाणं पवनदीपसोबतच अरूणिताने केलं आहे.
दरम्यान, इंडियन आयडियलचा 12 वा सिझन पवनदीपने जिंकला होता. तर अरूणिता कांजीलाल आणि सायली कांबळे हे रनरअप होते. अरूणिताच्या या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. इंडियन आयडियलचा 12 चा विजेता पवनदीप याच्यासोबत अरूणिताचं नाव जोडलं जातं. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचीही चर्चा वारंवार होत असते. अरूणिता आणि पवनदीप दोघे एकमेकांसोबत दिसतात. मात्र दोघांनी याबाबत कोणतीही जाहीर भूमिका स्पष्ट केलेली नाही.
अरूणिताला गाण्याशिवाय फिरण्याचीही आवड आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीप करत असते. ती उत्तरेकडे फिरण्यासाठी गेली होती. शिवाय सिडनीलाही ती गेलेली. आता अरूणिता सुपरस्टार सिंगर या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.