मुंबई : नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. सर्वत्र काँग्रेसच्या या परभवाविषयी बोललं जातंय. पंजाबमध्ये आपने मोठं यश मिळवलं. पण सत्ताधारी काँग्रेसला मात्र पराभवाखेरीज हाती काहीही टिकवता आलं नाही. मुख्यमंत्री चरणसिंह चन्नी (Charansingh Channi) यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. अश्यात आता पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhhu) हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण पराभवामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. पण आता सिद्धू यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्वाची खुर्ची आता दूर जाणार आहे.
सिद्धूंची खुर्ची जाणार
सिद्धू यांच्या पराभवानंतर त्यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. द कपील शर्मा शोमधली मानाची खुर्चीही आता काढून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी ट्विट करून घोषणा केली आहे.
अशोक पंडीत यांचं ट्वीट
द कपील शर्मा शोचे निर्माते अशोक पंडीत ट्वीट करत सिद्धू कार्यक्रमात दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “ज्या लोकांना नवज्योत सिंह सिद्धू यांच्या कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याविषयीची चिंता आहे. त्यांना मी सांगू इच्छितो. Federation Of Western India Cine Employees ने नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं नॉन को-ऑपरेशन जारी केलं आहे. याचा सरळ अर्थ आहे की ते ‘कपिल शर्मा शो’मध्ये परत दिसू शकत नाहीत”, असं अशोक पंडीत म्हणाले आहेत.
To all those who are worried about @sherryontopp ‘s return to #KapilSharmaShow Let me inform you that @fwicemum has issued a non cooperation against him for his support to a terrorist nation #Pakistan
This means he cannot do the show. pic.twitter.com/DoNyDDsSwf— Ashoke Pandit (@ashokepandit) March 10, 2022
सिद्धू यांच्या हातातून राजकारणातील खुर्ची चर गेली आहे. पण आता द कपील शर्मा शोमधली खुर्ची त्यांनी गमावली आहे. सिद्धू या कार्यक्रमात दिसणार नसल्याने त्यांचे चाहते मात्र नाराज आहेत.
संबंधित बातम्या