‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन बघता बघता एक महिना पूर्ण झाला आहे. गेले महिनाभर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील निक्की आणि अरबाजची मैत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण भाऊच्या चक्रव्यूहात गेल्यावर निक्कीसमोर सत्य आलं आहे. सत्य समोर आल्यानंतर निक्की आणि अरबाजमध्ये चांगलाच दुरावा आला आहे. निक्की एकटी खेळेल असं वाटत असताना तिने अभिजीतसोबत हातमिळवणी केलेली आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत गप्पा मारताना दिसत आहेत.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमोमध्ये बिग बॉस अभिजीत आणि निक्कीशी बोलतात. ‘अभिजीत जोडीत बांधले गेले आहात. या परिस्थितीवर कोणतं गाणं सुचतयं?’, असं बिग बॉस विचारतात. त्यावर अभिजीत म्हणतो,”हम दोनो”. त्यानंतर घरात एकच हशा पिकतो. अभिजीतच्या गाण्यानंतर अंकिता त्यावर प्रतिक्रिया देते. आज कळलं आम्हाला जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात!, असं अंकिता बोलते. त्यावर अभिजीत ‘कुछ तू लोग कहेंगे’ हे गाणं म्हणतो. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच कमाल असणार आहे. घरातील सदस्य घाबरलेले असताना दुसरीकडे निक्की आणि अभिजीत सदस्यांना चांगलच हसवणार आहेत.
बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी वरून एक वेगळाच वाद होत असल्याचा पाहायला मिळत आहे. अरबाजने त्याची कॅप्टनसी निक्कीला दिल्यापासून निक्की खूप बदलली आहे असे, अरबाज आणि टीम ‘ए’मधल्या बाकी सदस्याचे देखील मत आहे. या विषयावरूनच अरबाज, वैभव डीपीदादांशी बोलताना दिसत आहे.
बिग बॉसच्या नव्या प्रोमोत हा वाद दिसतोय. अरबाज डीपीदादांना म्हणत आहे की, “मला कंट्रोल नाही होत आता. मी कॅप्टनसी रूम सोडून बाहेर जात होतो झोपायला. बाथरूम साफ करत होतो, झाडू मारत होतो.” माझ्या कॅप्टनसीच्या रूममध्ये येऊ नकोस. माझ्या कॅप्टनसीवर अडथळा निर्माण होऊ शकतो, असं निक्की म्हणते.