ऐन सणासुदीच्या दिवशी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाद झाला आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा भावनांचा खेळ आहे. आता चौथ्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांनी तीन आठवड्यातच नाती निर्माण केली आहेत. छोटा पुढारी अर्थात घनश्याम दराडे आणि निक्की तांबोळीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की आणि छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातील घनश्याम दराडे आणि निक्की तांबोळीमधील वादाचा व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये निक्की घन:श्यामवर भडकलेली दिसतेय. तू फेक आहेस, असं ती म्हणते,. त्यावर काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय… तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता मी.. यावर निक्की म्हणते,”नको देऊ. त्यावर घन:श्याम म्हणतो,”निक्कू ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना, असं घन:श्याम तिला विचारतो.
निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. आम्ही दोघे बहीण -भाऊ म्हणत छोट्या पुढारीने निक्की सोबत मैत्री केली. पण दोघांच्या पप्पी आणि झप्पीमुळे प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. असं असतानाचा आता ऐन रक्षाबंधनच्या दिवशी या दोघांमध्ये मोठा वाद झालेला पाहायला मिळतंय. या वादाचे त्यांच्या नात्यावर काय परिणाम होणार हे येत्या काळात पाहावं लागेल.
बिग बॉसच्या घरात आज पंचनामा होणार आहे. टीम A आणि टीम B अशा दोन गटांमध्ये ‘सत्याचा पंचनामा’ होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य कधी खरं बोलतील आणि कधी काय कोणापासून लपवतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे ‘सत्याचा पंचनामा’मध्ये ते काय धमाका करणार हे पाहावं लागेल. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ,’आज होणार आहे सत्याचा पंचनामा…’, असं म्हणण्यात आलं आहे.