‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला आता सुरुवात झाली आहे. येत्या सहा ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा फिनाले होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं हे नवं पर्व संपायला थोडेच दिवस राहिले आहेत. घरातले सगळे सदस्य एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. आजच्या अनसीन अनदेखामध्ये सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी गार्डन एरियामध्ये बसल्याचं दिसत आहे. या दोघांमध्ये गप्पा रंगल्या आहेत. सूरज निक्कीला अरबाजच्या नावाने चिडवत आहे. या गप्पां दरम्यान निक्की सूरजला शब्द देते. मी जिंकली तर ट्रॉफी तुझ्या हातात देईन, असा शब्द निक्कीने सूरजला दिला आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या घरात सूरज आणि निक्कीमध्ये संवाद रंगला आहे. तुझा घरामध्ये मूड नसतोय कारण तुझा मुड घराच्या बाहेर गेला आहे. जर तुझा मूड समोर आला. तर लगेच त्याला मिठी मारशील. त्याला बोलशील, माझे पिल्लू किती दिवसांतून आले मला भेटायला. तुला सारखी त्यांची आठवन येत असते. तो अजून तूझ्या डोक्यातून नाही गेला, असं सूरज निक्कीला म्हणाला. त्यावर निक्कीने उत्तर दिलं आहे. असे काही नाही. मी अजिबात त्याच्या कडे जाणार नाही. मी उलट तूझ्याकडे येईन तू मला सांभाळ आणि त्याला बोल लांब राहा. मी त्याला माझ्या डोक्यातून कधीच काढून टाकले आहे, असं निक्की म्हणते.
सूरज निक्कीला बोलतो की, त्याला तू डोक्यातून काडून टाकशील. पण तो हृदयातून नाही जाणार. तू आता बोलतेस की, मी नाही जाणार पण जर तू तुला म्हणाला, निक्की सॉरी. लगेच तू त्याला माफ करून गळ्यात पडशील, असं सूरज म्हणाला. यावर निक्कीने त्याला उत्तर दिलं आहे. हा तुझा गैरसमज आहे. चल आपण पैज लावू. पैशाची नाही तुला जे हवे ते मी देईन. त्यावर सूरज म्हणाला,” मला ट्रॉफी देणार का? त्यावर निक्की म्हणाली,” हो, मी तुला आधीच म्हणाली की, मी जर जिंकली तर ट्रॉफी तुझ्या हातात देईन, असं निक्की म्हणते.
‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. शेवटच्या टप्प्यात आता हा खेळ आणखी रंगतदार होत चालला आहे. काहीच दिवसांत या पर्वाचा विजेता किंवा विजेती जाहीर होणार आहे. अशातच आज घरात डीजे क्रटेक्स आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचं आणि घरातील सदस्यांचं चांगलच मनोरंजन करणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आज घरात मिड वीक एव्हिक्शनदेखील पार पडणार आहे.