मुंबई : निशांत भट्ट (Nishant Bhat) हा बिग बॉसच्या 15चा विजेता (Big Boss 15 Winner) ठरेल, अशी पैज अनेकांनी लावली होती. त्याला कारणही तसंच होतं. ओटीटी बिग बॉसमध्ये फर्स्ट रनर अप राहिलेल्या निशांतच्या खेळीनं अनेकांना चकीत केलं होतं. तो जिंकेल असं अनेकांना वाटत होतं. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनाही त्याची काळजी वाटत होती. पण निशांतने तर दहा लाखाची बॅग घेत बिग बॉसला टाटा-बायबाय केलंय. दहा लाखाची कॅश घेऊन बिगबॉसच्या घरातून बाहेर पडत आता आपण खंबा मारणार असल्याचं निशांतने बिगबॉसच्या घरातून बाहेर पडताना म्हटलंय. बिग बॉस सीझन 15च्या फिनालेवेळी 10 लाख रुपयांची रोकड घेऊन बाहेर पडण्याचा पर्याय स्पर्धकांना देण्यात आला होता. एका ट्रॉफीसाठी थांबा किंवा 10 लाख घ्या आणि घराबाहेर पडा, असा पर्याय देण्यात आला होता. त्यावेळी निशांत भट्ट यांने 10 लाख घेत घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, निशांतनं घेतलेला हा निर्णय घाईचा तर ठरला नाही ना, अशीही शंका काही काळ निशांतच्या मनात आली होती. कारण त्याला मत देणाऱ्या चाहत्यांनी त्याला विजयी तर केलं नव्हतं ना, यावरुन काही काळ निशांत टेन्स झाला होता. त्यामुळे हा निर्णय योग्य होता की घाईत घेतलेला चुकीचा निर्णय होता, याबाबत अखेर सलमान खानंही निशांतला उद्देशून म्हटलं की त्याचा निर्णय हा त्याला वोट देणाऱ्यांचा अपमान करणारा होता. पण त्यानं घेतलेला निर्णय हा घाईचा नसून तो योग्यच होता, असं देखील सलमाननं त्याला म्हणत त्याच्या निर्णयाचं कौतुक केलंय.
निशांत भट्ट एक डान्सर आणि कोरीओग्राफर आहे. अनेक डान्स रियालिटी शोमध्ये निशांत भट्ट झळकला आहे. बिग बॉस 15मध्ये सामील होण्याआधी निशांत करण जोहरच्या बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्येही दिसला होता. फक्त दिसला नव्हता तर ही स्पर्धा त्यानं फस्ट रनर अप म्हणून जिंकत नावही काढलं होतं.
8 एप्रिल 1995 ला निशांतचा मुंबईत जन्म झाला आहे. निशांत मुंबईतच लहानाचा मोठा झाला आहे. त्याचं शिक्षणही मुंबईत झालं आहे. लहानपणापासून डान्सची आवड असणाऱ्या निशांत भट्टने आपल्या मेहनतीच्या जोरावर डान्समध्ये आपलं नाव कमावलंय. अनेक डान्स शोमध्ये सहभाग घेत त्यानं अनेक स्पर्धा जिंकल्याही आहेत. 2007 साली झलक दिखला जा पासून निशांतनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर 2010 मध्ये अंकिता लोखंडे आणि 2012मध्ये झलक दिखला जाच्या पाचव्या सीझनमध्ये अभिनेत्री जिया मानेकासाठी त्यानं कोरीओग्राफी केली होती.
आपल्या डान्सनं अनेक चाहत्यांना आकर्षित केलेल्या निशांतनं अल्पावधित अनेकांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. कमी वयातच प्रसिद्ध झालेला निशांत भट्ट हे कोरीओग्राफीमधलं एक आघाडीचं नाव आहे.
रणबीर कपूरच्या ऐ दिल है मुश्किल गाण्याची कोरीग्राफी निशांतनं केली आहे. शिवाय त्यानं डान्स टिचर म्हणून माधुरी दीक्षितच्या ऑनलाईन डान्स ऍकेडमीतही काम केलंय. शिवाय गुमराह नावाच्या एका मालिकेतही त्यानं अभिनय केला होता. शिवाय लाईफ ओकेमधील आसमान के आगेमध्ये देकील त्यानं काम केल होतं.
वाचा बिग बॉस 15 चे लाईव्ह अपडेट्स
बिग बॉसचे आजवरचे विजेते कोण आहेत? वाचा एका क्लिकवर संपूर्ण यादी
‘मला तुमची मदत हवी आहे’, बहिणीसाठी शिल्पा शेट्टींची चाहत्यांना कळकळीची विनंती