‘बिग बॉस मराठी’चं घर सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. या घरात घडणाऱ्या घडामोडींवर महाराष्ट्राच्या घराघरात चर्चा होत असते. दर आठवड्याला होणाऱ्या ‘भाऊचा धक्का’ला प्रेक्षकांची पसंती मिळते. टीआरपीमध्ये देखील ‘भाऊचा धक्का’ अव्वलस्थानी आहे. ‘भाऊचा धक्का’वरून अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख घरातील सदस्यांशी संवाद साधत असतो. या आठवड्याच्या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने काही सदस्यांची शाळा घेतली. वैभव चव्हाणलाही त्यांनी धारेवर धरलं आहे. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नको, असं रितेश म्हणाला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतो आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आम्ही वैभव चव्हाणला पाठवला आहे. तुम्ही गद्दार म्हणून बाहेर पडू नका, असं म्हणत भाऊच्या धक्क्यावर रितेशने वैभव चव्हाणची हजेरी घेतली.
तुम्ही मला तुमच्या टीमचा सदस्य समजू नका, असं वैभव तू म्हणायला हवं होतंस. पण खरं बोलायला जिगर लागते. ही जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. ही जिगर तुमच्यात दिसत नाही. इथून पुढे तुमच्यावर कोणी विश्वास का ठेवायचा. तुमच्या आत आहे तेच बाहेर दिसणार आहे. प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झालाय..मला बघायचंय ही मैत्री कधीपर्यंत टिकते. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलंय गद्दार म्हणून बाहेर पडू नका, असं म्हणत रितेश वैभव चव्हाणला सुनावतो.
बॉर्डरवरचा सैनिक समोरच्या सैनिकावर गोळ्या झाडण्यापेक्षा आपल्या सैनिकावर गोळ्या झाडतो याला काय म्हणतात? असं रितेश घरातील सदस्यांना विचारतो. त्यावर घरातील सदस्य फितूर, शत्रू, धोकेबाज, गद्दार असे शब्द सांगतात. बिग बॉसच्या घरातील गद्दार कोण आहे? असं रितेश अरबाज पटेलला विचारतो. त्यावर अरबाज वैभवचं नाव घेतो. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या टास्कमध्ये वैभवने गद्दारी केलेली दिसून आली आहे. त्यामुळे रितेशने त्याची चांगलीच हजेरी घेतली आहे.