मुंबई : बॉलिवूडच नाही तर, छोट्या पडद्यावरही अनेक जोड्या खूप चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांना आणि सगळ्या प्रेक्षकांना वाटत होते की, या जोड्यांनी लवकरात लवकर लग्नबंधनात अडकावे. मात्र, त्यांचे प्रेम हे लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. मात्र, त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहते आणि प्रेक्षक देखील अवाक् झाले होते.
अनेक स्टार्स बघून असे वाटले होते की, ते लवकरच लग्न करतील पण त्यांचे ब्रेकअप झाले. दुसरीकडे, काही लव्ह बर्ड्स लग्न करूनही एकमेकांपासून विभक्त झाले. टीव्हीच्या या लव्ह बर्ड्सच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी त्यांच्या अफेअरपेक्षा जास्त चर्चा रंगवल्या होत्या.
ऋत्विक आणि आशा ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर भेटले. शूटिंग दरम्यान ते हळूहळू एकमेकांच्या खूप जवळ आले. सेटवरचा रोमान्स खऱ्या आयुष्यात कधी सुरू झाला, हे कोणालाच कळले नाही. यानंतर ऋत्विक आणि आशा यांनी मीडियासमोर उघडपणे आपले प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली. चाहत्यांना वाटले की, आता त्यांचे हे नाते निश्चितपणे लग्नाच्या बंधनात बांधले जाईल, परंतु अचानक दोघांमध्ये बिनसल्याच्या आणि ऋत्विक-आशा विभक्त झाल्याच्या बातम्या चर्चेत आल्या.
आमिर आणि संजीदाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. दोघेही एकत्र खूप चांगले दिसत होते आणि त्यांच्या लग्नामुळेही चाहते खूप आनंदी होते. तथापि, वर्ष 2020च्या सुरुवातीला, अशा बातम्या येऊ लागल्या की आमिर आणि संजीदा यांच्या नात्यात काहीतरी बिनसले आहे. अगदी संजीदाने आमिरचे घर सोडले आणि तिच्या आईसोबत राहायला सुरुवात केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, आमिरने या गोष्टी स्वीकारण्यास नकार दिला.
पूजा आणि राज यांची प्रेमकथा खूप चर्चेत होती. ‘कोई आने को है’ या शोच्या सेटवर राज आणि पूजा एकमेकांच्या जवळ आले. तेव्हापासून दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते की, दोघेही लग्न करतील. पण, 2020मध्ये राज आणि पूजा यांनी त्यांचे ब्रेकअप झाले असल्याचे स्पष्ट केले. मात्र, नातेसंबंध संपल्यानंतरही दोघांमध्ये कटुता नव्हती आणि ते अजूनही चांगले मित्र आहेत.
‘दिल मिल गये’ची अरमान (करण) आणि रिद्धिमा (जेनिफर) यांची सुपरहिट जोडी एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकली तेव्हा त्यांचे चाहते आनंदाने वेडे झाले होते. करण आणि जेनिफरचे लग्न झाले आणि त्यांच्या लग्नाबद्दल बरीच चर्चा देखील झाली. मात्र, लग्नाला काही काळ पूर्ण होतोच तोच दोघांच्या नात्यामध्ये फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि दोघांचा घटस्फोट झाला. करण आणि जेनिफरच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
दिव्यांका आणि शरदचे प्रेम ‘बनून मैं तेरी दुल्हन’ च्या सेटवर सुरू झाले. ऑनस्क्रीन रोमान्स करणारे हे स्टार्स वास्तविक जीवनातही एकमेकांच्या जवळ आले होते. तथापि, काही काळानंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी बाहेर आली, ज्याने चाहत्यांना खूप आश्चर्यचकित केले. बऱ्याच वर्षांनंतर दिव्यांकाने सांगितले होते की, शरदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती खूप कोलमडली होती. दोघे आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, पण या नात्याचा वेदनादायक शेवट झाला.
‘थलायवी’ नंतर आता कंगना रनौत साकारणार ‘सीता’, नव्या चित्रपटाची हटके घोषणा