मुंबई : यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा 2022 (Star Pravah Parivar Puraskar 2022) नुकताच थाटात पार पडला. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण अश्या या सोहळ्यात रंग माझा वेगळा (Rang Majha Vegala) सर्वोत्कृष्ट मालिकाठरली. तर सर्वोत्कृष्ट सून फुलाला सुगंध मातीचा (Ya Phulala Sungandh Maticha) मालिकेतील कीर्ती जामखेडकर ठरली आणि सर्वोत्कृष्ट नवऱ्याचा पुरस्कार याच मालिकेतील शुभमला मिळाला. अरुंधतीला (Arundhati) मिळाला सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार. तर संजना (Sanjana) सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरली. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप आणि गौरीला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार मिळाला . तर स्वाभिमान मालिकेतील शंतनू-पल्लवीला सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट बाबा पिंकीचा विजय असो मालिकेतील म्हादू ठरले . तर सर्वोत्कृष्ट मुलगी ठरली लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू…
रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदार यांना सर्वोत्कृष्ट सासुचा पुरस्कार मिळाला. तर आई कुठे काय करते मालिकेतील आप्पा सर्वोत्कृष्ट सासरे ठरले . ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील कानेटकर परिवाराने सर्वोत्कृष्ट परिवार हा पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ट भावंड या पुरस्काराचे मानकरी सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील सूर्या, पश्या, वैभव आणि ओंकार ठरले. सर्वांचा लाडका होस्ट सिद्धार्थ चांदेकरला सर्वोत्कृष्ट सुत्रधाराचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहऱ्याचा पुरस्कार मिळाला अबोली मालिकेतील अंकुशला. यासोबतच सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य म्हणून मुरांबा मालिकेतील अक्षय आणि पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकीला सन्मानित करण्यात आलं.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, भरत जाधव, वैजयंती आपटे,मिलिंद इंगळे यांनी परिक्षणाची धुरा सांभाळली. परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.
संबंधित बातम्या