‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. पाचवा आठवडा सरत आला. आता सदस्यांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. कालच्या ‘भाऊचा धक्का’वर विविध गोष्टी घडल्या. यावेळी बिग बॉसच्या घरातील सदस्य गाण्यांवर थिरकताना दिसले. गुलीगत सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा देखील बिग बॉसच्या घरात धम्माल करताना दिसतोय. सूरजची झापूक झुपूक स्टाईल प्रेक्षकांनादेखील आवडते आहे. त्याचे डायलॉग, डान्स अन् बिग बॉसच्या घरातील वावर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतो. आता एका वेगळ्या रूपात सूरज दिसला आहे. ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये सूरज आणि जान्हवी किल्लेकर हे डान्स करताना दिसले.
सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांनी ‘भाऊचा धक्का’ या विशेष एपिसोडममध्ये कल्ला केला. ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर दोघांनी डान्स केला. सूरजची खास झापुक झुपूक स्टाईल देखील यावेळी पाहायला मिळाली. दोघांनी झापुक झुपूक स्टाईलने डान्स केला. हा डान्स बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी देखील इन्जॉय केला. या दोघांचा डान्स सोशल मीडियावर चर्चेत आहे. सूरजची झापुक झुपूक स्टाईल आणि जान्हवीचा दिलखेच अंदाज पाहायला मिळाली. तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर अभिजीत आणि निक्कीचा कपल डान्सदेखील पाहायला मिळाला. सर्व जोड्यांचा कल्ला ‘बिग बॉस प्रेमी’साठी मनोरंजक होता.
भाऊचा धक्कावर सूरज आणि जान्हवी यांनी केलेला डान्स प्रेक्षकांना भावला आहे. प्रेक्षकांनी या डान्सला पसंती दिलीय. सुरज भाऊच्या डान्सचा नादच करायचा नाही. मटकीला मोड नाही. सुरजभाऊला तोड नाही… एकनंबर डान्स, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केलीय. फायर परफॉर्मन्स… आता कसं मस्त… आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या सूरजची ही ‘गुडघा बेंड’ डान्स स्टेप 100 % साऊथ फिल्ममध्ये कॉपी केली जाणार आहे, अशी कमेंट याआधीच्या बिग बॉसमधील स्पर्धक उत्कर्ष शिंदे याने केली आहे.
‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन आता 36 दिवस उलटले आहेत. बिग बॉस मराठी शोचा आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांची चांगलीच झोप उडाली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सगस्यांची चांगलीच शाळा घेतली. गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून कोणीही सदस्य बाहेर पडलं नाही. आता हा आठवडा कसा रंगणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.