‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन गाजतोय तो घरातील सदस्यांमुळे… वेगवेगळ्या स्वभावाचे आणि वेगवेगळा चाहतावर्ग असणारे स्पर्धक यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण…. सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. त्याचा साधेपणा प्रेक्षकांना भावतो. त्याचं बिंधास वागणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. आजच्या भागातही तो प्रेक्षकांना रडवताना दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’चा फिनाले जवळ आला आहे. त्यामुळे स्पर्धकांच्या कुटुंबियांना ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बोलावलं आहे. सूरज चव्हणाचे कुटुंबियदेखील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आलेत. यावेळी सूरजच्या घरच्यांच्या साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या प्रोमो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाण याचे कुटुंबिय आले आहेत. सूरजची बहीण आणि आत्या आलेत. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत की, सूरज स्वागत करुयात आपल्या बहिणींचं आणि आत्यांचं…. सूरज आणि आत्या, बहिणीमधील प्रेमळ संवादाने प्रेक्षकांचं मनं जिंकून घेतलं आहे. तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं आहे. सूरजला ‘बिग बॉस मराठी’च्या आलिशान घरात पाहून त्याच्या बहिणींना आणि आत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, असं सूरजच्या बहिणी आणि आत्या त्याला म्हणत आहे.
सूरजचे कुटुंबिय त्याला भेटायला आल्याचा व्हीडिओ ‘कलर्स मराठी’कडून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. इतकी साधी माणसं आहेत, त्या सर्वांनी घरात जायचा आधी चपला कडल्या…..मन जिंकल राव, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सिझनचा विजेता विशाल निकम यानेही सूरजच्या या व्हीडिओवर कमेंट केली आहे. गावाची माणसं, गावाची माती, गावचा गोडवा… हे सगळं माझ्या गावाकडची माणसचं प्रेम… संपला विषय, असं विशाल म्हणाला आहे. बहिणींनी घरात प्रवेश करताच चप्पल बाहेर काढले हिच खरी संस्कृती आहे आपली… आत्याने घरात पाऊल ठेवल्यापासून ते घरातून पाऊल निघेपर्यंत डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही, अशी कमेंट सूरजच्या चाहत्याने केलीय.