‘बिग बॉस मराठी’ चा यंदाचा सिझन गाजतोय तो घरातील स्पर्धकांमुळे… ‘बिग बॉस मराठी’तील स्पर्धक सूरज चव्हाण हा त्याच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतो. सूरजने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक किस्सा सांगितला आहे. लग्नातल्या वरातीतील हा किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. सूरज, पॅडी भाऊ आणि अंकिता लिव्हिंग एरियात असताना सुरजने पॅडी भाऊंना लग्नाच्या वरातीतला एक किस्सा सांगितला आहे. घोडा नवरदेवाला घेऊन पळाल्याचा किस्सा सूरज चव्हाणने सांगितला. तो वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.
‘बिग बॉस मराठी’ घरात सूरजने भन्नाट किस्सा सांगितला आहे. आमच्या गावात वरात घोड्यावरून निघते आणि डीजे असला की, पोरी घोड्यावर बसतात आणि घोडा व पोरी दोघे पण नाचतात. घोडा कधी-कधी पाय वर करून नाचतो तेव्हा पोरी घाबरता मग पोरी घोड्याची लगाम खेचतात, असं सूरज म्हणाला. यावर पॅडी भाऊ म्हणाले, मला वाटले घोड्याचे पाय वर होतात का? तर सूरज त्याला उत्तर देतो. एकदा असेच झाले होते. एका घोड्याने पाय वर केले आणि तो नवरा मुलगा खाली पडला… त्याच्या खाली माणसे पण दबली गेली .अजून एका लग्नात तर घोडा नवरा मुलाला घेऊन पळाला आणि परत आलाच नाही, असं सूरज म्हणाला. यावर पॅडी उत्तर देतो. हे सगळे तुझ्याच गावी कसे होते?, असा प्रश्न पॅडी सूरजला विचारतो.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या अनसीन अनदेखामध्ये पॅडी आणि सूरज यांच्यातूल संभाषण दाखवण्यात आलं आहे. गार्डन एरियात बसले असताना पॅडीने सूरजची शिकवणी घेतल्याचं व्हीडीओत दिसत आहे. जेव्हा तुला वाचायला येईल तेव्हा जे हातात मिळेल मग तो पेपर असो या पुस्तक सगळे वाच. जे तू वाचतोय त्याच्या अर्थ समजून घ्यायचा आणि मग वाचायचे. शब्द समजून घ्यायचा प्रयत्न कर, असं पॅडी म्हणाला.
सूरज पॅडीचा मदतीने गार्डन एरियात जिथे सदस्याच्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत. ते वाचायचा प्रयत्न करत आहे. पॅडी भाऊ त्याला शब्द, उच्चार, काना, अनुस्वार यांची ओळख करून देत वाचायला शिकवत आहेत. भाऊंनी त्याला वर्षा ऊसगांवकर हे नाव उच्चारायला शिकवले आहे.