‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचा बॉन्ड नेटकऱ्यांच्या आणि ‘बिग बॉस’ प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अशातच आता आणखी एक प्रेमकहाणी फुलू शकते. रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुलताना दिसून येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना आणि तिला जास्त महत्त्व देताना दिसून येत आहे. या प्रोमोमुळे वैभव आणि इरिना प्रेमात पडत असल्याची चर्चा होत आहे.
‘बिग बॉस मराठी’ चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात वैभव आणि इरिना यांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणतोय, ‘कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय’. त्यावर इरिना ‘हो’ असं उत्तर देते. तर दुसरीकडे जान्हवी वैभवला ‘फॉरेनची पाटलीन मस्त आहे’, असं म्हणते. हे सगळं पाहिल्यावर त्यावर निक्की बोलते. ‘भाई… तुझं काय चाललंय, असं निक्की म्हणते.
निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या केमेस्ट्रीची चर्चा असतानाच आता वैभव आणि इरिना यांची जोडी जुळताना दिसतेय. बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय? की नाटक आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना पुढचा एपिसोड पाहावा लागणार आहे. या दोघांचं प्रेम बहरतं का? हे पाहावं लागणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज पहिला कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं या कॅप्टनसी कार्याचं नाव आहे. या टास्कदरम्यान घरात सूरज आणि वैभवमध्ये दोरदार भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. ‘दम असेल तर मला हात लावून दाखव’, असं वैभव सूरजला म्हणतो. पण इरिना मात्र सूरजला शांत करते.