वैभव चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर; म्हणाला, अरबाजसोबतची लढाई…

| Updated on: Sep 16, 2024 | 9:38 AM

Vaibhav Chavan Out From Bigg Boss Marathi : वैभव चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडला आहे. काल 'भाऊचा धक्का' पार पडला. यात कमी वोट मिळाल्याने वैभव चव्हाणला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. यावेळी वैभव चव्हाण काय म्हणाला? वाचा सविस्तर...

वैभव चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर; म्हणाला, अरबाजसोबतची लढाई...
वैभव चव्हाण
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतो आहे. आता हा रिअॅलिटी शो एका रंजक वळणार येऊन ठेपला. निक्की तांबोळीच्या कानाखाली मारल्याने आर्या जाधवला घरातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाणचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपला आहे. या आठवड्यात वैभवसह अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यात आर्याला बिग बॉसच्या घरातून निष्कासित केले गेले. तर प्रेक्षकांच्या वोटिंगचा मान ठेवच वैभवला घर सोडावं लागलं.

वैभव चव्हाण ‘बिग बॉस’ च्या घरातून बाहेर

वैभव चव्हाणने आपल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व असणारा वैभव ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खेळण्यात कुठेतरी कमी पडला. वैभव चव्हाण अशी ओळख मिळवण्यापेक्षा ‘अरबाज 2’ अशी ओळख त्याने मिळवली. कधी गद्दारी केल्याने तर कधी रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं लावल्याने तो चर्चेत होता. आता वैभव घराबाहेर पडल्याने त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

घरातून बाहेर पडताना वैभव काय म्हणाला?

‘बिग बॉस मराठी’ च्या घराचा निरोप घेताना वैभव चव्हाण भावूक झाला. तुम्ही दिलेले सल्ले मी फॉलो करायला हवे होते. पण मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही याचं मला खरचं खूप दु:ख आहे. आता बाहेर पडल्यानंतर मला जान्हवीची खूप आठवण येईल. तर अरबाजसोबतची लढाई अजून बाकी आहे. बाकी सदस्यांना उत्तम खेळण्यासाठी शुभेच्छा देतो, असं म्हणत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हिरो होण्याची वैभवला अनेकदा संधी मिळाली होती. रितेशने देखील त्याला वारंवार सांगितलं होतं. पण मिळालेल्या संधीचं वैभव सोनं करू शकला नाही. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ वैभव चांगला खेळला. पण तो आणखी चांगला खेळू शकला असता. इनव्हेस्टमेंट बॉक्समध्ये असलेले 50 पॉईंट्सच्या दोन कॉइनचे नॉमिनी वैभवने जान्हवी आणि अरबाजला दिले.