मुंबई : यावर्षी अभिनेत्री कंगना रनौतसाठी (Kangana Ranaut) वाढदिवस सर्वात अविस्मरणीय ठरणार आहे. कारण, 23 मार्च रोजी तिच्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचा अर्थात ‘थलायावी’चा ट्रेलर लाँच होणार आहे. कंगनाचा हा खास दिवस संस्मरणीय करण्यासाठी ‘थलायवी’ची टीम कसलीही कसर सोडणार नाहीय. चित्रपटाच्या प्रमोशनची प्रत्येक शैली स्वत:मध्येच खास असणार आहे. याची सुरुवात खास बॉलिवूड क्वीन कंगना रनौतच्या वाढदिवसापासून होणार आहे (Thalaivi Trailer will Launch on Kangana Ranaut birthday).
दिग्दर्शक विजयच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आणि ‘थलायवी’ चित्रपटाशी संबंधित प्रत्येक कलाकारासाठी हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आपल्या औदार्य आणि प्रेमाने तामिळनाडूच्या राजकारणाला नवा आयाम देणारी एक अद्भुत अभिनेत्री आणि दिवंगत नेत्या जयललिता यांच्या जीवनातील विलक्षण बाबींची झलक अभिनेत्री कंगना रनौतच्या वाढदिवशी पाहायला मिळणार आहे. कंगनाच्या चाहत्यांसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी भेट असणार आहे.
To Jaya Amma, on her birthanniversary
Witness the story of the legend, #Thalaivi, in cinemas on 23rd April, 2021. @thearvindswami #Vijay @vishinduri @ShaaileshRSingh @BrindaPrasad1 @neeta_lulla #BhushanKumar @KarmaMediaent @TSeries @vibri_media #SprintFilms @ThalaiviTheFilm pic.twitter.com/JOn812GajH— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 24, 2021
भरतनाट्यमच्या मुद्रा शिकण्यापासून, तामिळ भाषा आणि जयललिता यांचे हावभाव शिकण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली आहे. यासोबतच अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता अरविंद स्वामी यांची केमिस्ट्रीदेखील या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. जयललिता आणि एम. जी. रामचंद्रन यांच्या आयुष्यातील अनेक खास क्षण यावेळी पडद्यावर दिसणार आहेत. दोघांचाही फर्स्ट लूक पाहून, ते पडद्यावर कसे दिसतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे (Thalaivi Trailer will Launch on Kangana Ranaut birthday).
या चित्रपटात एम. जी. रामचंद्रन यांची व्यक्तिरेखा अरविंद स्वामी यांनी साकारलेली आहे. त्यांच्या या व्यक्तिरेखेचा एक लूक सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. अरविंद स्वामी यांच्या नव्या लूकची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. त्यांनतर आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे ठरले असून 23 एप्रिलला रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
दरम्यान, हा चित्रपट ए. एल. विजय यांनी दिग्दर्शित केला असून विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश सिंग यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. एकूण तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे या चित्रपटात नेमके काय असणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच, या चित्रपटात जयललीता यांच्या जीवनाच्या कोणत्या पैलूंचा उलगडा केला होणार?, हेही या चित्रपटात पाहणे महत्वाचे ठारणार आहे.
हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये जयललिता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
(Thalaivi Trailer will Launch on Kangana Ranaut birthday)