मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : बोल्ड अभिनेत्री आणि मॉडेल पुनम पांडे हीच्या सव्हार्यकल कॅन्सरने झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पुनम पांडे हीच्या चाहत्यांना या घटनेने धक्का बसला आहे. त्यानंतर सव्हार्यकल कॅन्सर नेमका कसला आजार आहे. हा आजार कशामुळे होतो याविषयी चर्चेला तोंड फुटले आहे. मात्र, काल संसदेत बजेटचे भाषण करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांना सर्वात जास्त धोका असलेल्या सव्हार्यकल कॅन्सर बद्दल एक महत्वाची घोषणा केली होती. ही घोषणा नेमकी काय होती ते पाहूयात…
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत बजेट सादर करताना सर्व्हाकल कॅन्सरबाबत एक मोठी घोषणा केली. त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचे शेवटचे अंतरिम बजेट सादर केले. त्यावेळी त्यांनी देशातील 9 ते 14 वर्षांच्या मुलींचे सर्व्हायकल कॅन्सर विरोधात लढण्यासाठी लसीकरण करण्यासंदर्भात सरकारची योजना असल्याचे सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अन्य आरोग्य योजनांबद्दल देखील माहीती दिली. ज्यात आशा कार्यकर्त्या आणि अंगनवाडी कार्यकर्त्या आणि सहकाऱ्यांना आयुष्यान भारतचे लाभ देण्याची घोषणा केली.
सर्व्हायक कॅन्सर जगातील चौथा सर्वसामान्य कॅन्सर आहे. यात महिलांच्या मृत्यूत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट भाषणात सांगितले की आमचे सरकार सर्व्हायक कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 18 वयोगटातील तरुणींचे लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.
भारतात सर्व्हाकल कॅन्सरच्या दरवर्षी 80 हजाराहून अधिक केसेस उघड होतात. तर 35 हजार महिलांचा त्याने मृत्यू होतो. सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक स्वदेशी लसीची निर्मिती पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटने केली आहे. याचे नाव CERVAVAC ठेवले आहे. ही देशातील पहीली सर्व्हायकल कॅन्सरची वॅक्सीन बनली आहे. या लसीची ट्रायलही सर्व वयोगटातील महिलांवर यशस्वी झाली होती.
सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होय. महिलांच्या गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे सर्व्हिक्स किंवा ग्रीवा. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. महिलांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. जर वेळीच माहीती झाले तर याचा उपचार होऊ शकतो. परंतू उशीर झाल्यास यात मृत्यू होतो. हा आजार ह्युमन पॅपीलोमा व्हायरसमुळे होतो. त्यास एचपीव्ही म्हणून ओळखले जाते. जे जगभरात सर्वाधिक प्रचलित यौन संचारीत संक्रमण ( एसटीआय ) म्हटले जाते.