मुंबई : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या वैयक्तिक जीवनाची फारशी चर्चा होत नाही. अभिनेता नेहमीच त्याच्या कामामुळे अर्थात अभिनयामुळे चर्चेत असतो. पण आज आम्ही तुम्हाला मनोजच्या वैयक्तिक जीवनाची ओळख करून देणार आहोत. मनोज बाजपेयी आज बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. ज्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि हटके भूमिकांनी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे (The Family Man 2 fame actor Manoj Bajpayee and his wife neha cute love story).
अभिनेता मनोज बाजपेयी यांचे पहिले लग्न मुंबई येथे येण्यापूर्वीच झाले होते. त्यांचे लग्न दिल्लीतील एका मुलीशी झाले होते. पण, या जोडीचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. असं म्हणतात की, त्यावेळी मनोज स्ट्रगल करत होता. ज्यामुळे हे संबंध तुटले. यानंतर मनोज दिल्ली सोडून मुंबईत दाखल झाला आणि तिथेच त्याने चित्रपटांमध्ये काम शोधण्यास सुरुवात केली.
स्ट्रगल करत असताना त्याची भेट अभिनेत्री नेहाशी झाली. मनोज यांच्या पत्नीचे अर्थात नेहाचे खरे नाव शबाना रझा आहे. नेहाने बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात तिच्या ‘करीब’ या चित्रपटाद्वारे केली होती. या चित्रपटात ती बॉबी देओल याच्या सोबत दिसली होती. हा चित्रपट 1998मध्ये प्रदर्शित झाला होता. नेहाचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील नांदेड येथे वास्तव्यास आहे (The Family Man 2 fame actor Manoj Bajpayee and his wife neha cute love story).
शबानावरून नेहाचे नाव बदलण्याचे काम दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी केले. त्यानंतर लोक तिला नेहा नावाने ओळखू लागले. नेहाचा चित्रपट ‘करीब’ रिलीज झाल्यानंतर मनोज आणि नेहाची जवळीक वाढली होती. दरम्यान, मनोजचा ‘सत्या’ हा चित्रपटही बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि या चित्रपटाने मनोजला रातोरात बॉलिवूडचा सुपर स्टार बनवले. त्याचवर्षी दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. बरीच वर्ष डेटिंग सत्रानंतर दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला आणि 2006 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.
लग्नाआधी नेहाने ‘होगी प्यार की जीत’, ‘फिजा’, ‘राहुल’ यासारख्या अनेक बड्या चित्रपटांमध्ये काम केले होते. इतकेच नाही तर, या अभिनेत्रीने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. पण मनोज सोबत लग्नानंतर या अभिनेत्रीने केवळ 1 चित्रपटात काम केले. कारण, लग्नानंतर ती तिच्या संसारात व्यस्त झाली आणि तिने मनोरंजन विश्वास पूर्णपणे निरोप दिला. त्याच वेळी नेहाने एका खास मुलाखतीत सांगितले की, “मला कामासाठी अनेक ऑफर आल्या, पण मी माझ्या कुटुंबात खूप आनंदी आहे, ज्यामुळे मी स्वतःहून काम करण्यास नकार दिला”. मनोज आणि नेहा यांना ‘अवा’ नावाची एक छोटी मुलगी आहे.
(The Family Man 2 fame actor Manoj Bajpayee and his wife neha cute love story)
VIDEO | जाऊया डबल सीट रं… ‘देवमाणूस’मधील एसीपी दिव्याचा हवालदार शिखरेंसोबत भन्नाट डान्स
PHOTO | ‘कीस काँट्रोवर्सी’ विसरून पुन्हा घेतली एकमेकांची ‘गळाभेट’, राखी सावंत-मिका सिंगचे फोटो चर्चेत!#RakhiSawant | #mikasingh | #Bollywood https://t.co/uBOuzPiYQG
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2021