हे लक्षात ठेव … सोनाक्षीच्या भावी पतीला बड्या अभिनेत्रीने दिली वॉर्निंग

| Updated on: Jun 14, 2024 | 12:22 PM

'हिरामंडी' स्टार सोनाक्षी सिन्हाचं तिच्या भूमिकेसाठी मोठं कौतुक झालं, पण सध्या ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आहे. सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहेत. मात्र त्याबद्दल अभिनेत्रीने किंवा तिच्या होणाऱ्या पतीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही

हे लक्षात ठेव ...  सोनाक्षीच्या भावी पतीला बड्या अभिनेत्रीने दिली वॉर्निंग
Follow us on

‘हिरामंडी’ स्टार सोनाक्षी सिन्हाचं तिच्या भूमिकेसाठी मोठं कौतुक झालं, पण सध्या ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आहे. सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहेत. मात्र त्याबद्दल अभिनेत्रीने किंवा तिच्या होणाऱ्या पतीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. किंबहुना तिच्या कुटुंबियांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या लग्नाची खबर पक्की आहे मात्र कोणी त्यावर बोलत नाहीये. बॉलिवूडमधूल अनेक कलाकारांना लग्नाचं निमंत्रही मिळालं आहे. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्रीने मात्र बोलता-बोलता सोनाक्षी जहीरच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. सोनाक्षी तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकण्यास सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे पूनम धिल्लो. त्यांना सोनाक्षी-जहीरच्या लग्नाचं आमंत्रणही मिळालं असून त्यांनी सोनाक्षीच्या होणाऱ्या पतील एक वॉर्निंगही दिली आहे.

जहीर इक्बालसोबत सोनाक्षी लग्न करत असल्याच्या बातम्या समोर आल्यापासून ‘दबंग’ स्टार सतत चर्चेत आहे. पण लग्नाबाबत सोनाक्षी आणि जहीर दोघांनी अळीमिळी.. हे धोरण कायम ठेवले असून, कोणीच काही बोलायला तयार नाहीये. नुकतंच त्या दोघांचं एक ऑडिओ इन्व्हाईटही व्हायरलं होतं, ज्यामध्ये दोघे लग्नाच्या पार्टीसाठी इनव्हाइट करत होते. त्यातच आता दिग्गज अभिनेत्री पूनम धिल्लो यांनीही या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

पूनम धिल्लो यांनी गुपित उलगडलं

एका रिपोर्टनुसार, पूनम ढिल्लो यांनी या लग्नाच्या बातमीचं गुपित उलगडलं आहे. त्यांनी सोनाक्षी आणि जहीर इक्बालच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं. ‘मी सोनाक्षीला शुभेच्छा देते. तिने खूप सुंदर निमंत्रण (पत्रिका) पाठवलं आहे. ती एक छोटीशी मुलगी होती, तेव्हापासून मी तिला ओळखते. तिचा संपूर्ण प्रवास, आयुष्य़ मी पाहिलं आहे. तिचं पुढलं आयुष्य आनंदात, सुखात जावो, अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. तुम्हीही तिला शुभेच्छा द्या. ती आम्हा सर्वांची अतिशय लाडकी आहे ‘ असं पूनम धिल्लो म्हणाल्या.

सोनाक्षीच्या होणाऱ्या पतीला दिली वॉर्निंग

एवढंच नव्हे तर पूनम धिल्लो यांनी हसत-हसत सोनाक्षीच्या होणाऱ्या पतीला, जहीर इक्बाल याला थेट वॉर्निंगही दिली आहे. ‘ जहीर, तू तिला ( सोनाक्षी) नेहमी आनंदी ठेव. लक्षात ठेव, ती अतिशय प्रेमळ, गोड मुलगी आहे. आमच्यासाठी ती खूप खास आहे ‘ अषा शब्दांत त्यांनी संदेश दिला.

अशी झाली ओळख

सोनाक्षी – झहीर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेता सलमान खान याच्या पार्टीमध्ये दोघांची पहिली ओळख झाली. त्यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी – झहीर यांनी एकत्र स्क्रिन देखील शेअर केली आहे. ‘डबल एक्सएल’ सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं आहे.

वडील शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले ?

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाचे निमंत्रण ऑनलाइन लीक झाल्यानंतर काही तासांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनीही महत्वाचा खुलासा केला. ‘माझा पाठिंबा आणि आशीर्वाद सोनाक्षीच्या पाठीशी आहेत. तिच्या प्रत्येक निर्णयात मी त्याच्यासोबत असतो. ती ज्याला जीवनसाथी म्हणून निवडेल तो तिच्यासाठी सर्वोत्तम असेल. माझ्या मुलीच्या लग्नात मी सर्वात आनंदी बाप आहे’, असे ते म्हणाले.

जहीर-सोनाक्षीचे ऑडिओ इन्व्हाईट झाले लीक

झहीर-सोनाक्षीचे ऑनलाइन इन्व्हाईट सोशल मीडियावर लीक झाले होते. व्हायरल झालेल्या या ऑडिओ कार्डनुसार, दोघे 23 जून रोजी लग्न करणार आहेत. या लग्नपत्रिकेत ऑडिओ QR कोड देखील आहे, ज्यामध्ये सोनाक्षी आणि झहीरचा एक सुंदर संदेश देखील आहे.