बच्चन कुटुंबाचं नाव नेहमीच चर्चेत असतं. अमिताभ, जया, अभिषेक, ऐश्वर्या बच्चन कुटुंबातील बहुतांश लोक सिनेसृष्टीशी निगडीत आहेत. मात्र जया बच्चन यांच्या माहेरच्यांबद्द बोलायचं झालं तर त्यांच्याव्यतिरिक्त कोणीच या क्षेत्रातील नाही. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांब्दल जास्त लोकांना माहीत नसेल. पण जया बच्चन यांच्या बहिणीचा नवराही अभिनेता आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? तेही विख्यात अभिनेते असून त्यांनी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. कोण आहेत ते ? बच्चन कुटुंबाशी त्यांचं असलेलं नातं फारच मी लोकांना माहीत असेल.
जया बच्चन यांची बहीण रीटा भादुरी या लग्नानंतर रीटा वर्मा झाल्या त्यांच्या पतीचं नाव आहे राजीव वर्मा. राजीव वर्मा हे चित्रपटसृष्टीतील परिचित नाव असून ते अनेक चित्रपटांमध्ये दिसले आहेत. ‘मैंने प्यार किया’ मध्ये अभिनेता सलमान कानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. तर सूरज बडजात्या यांनीच दिग्दर्शित केलेला आणखी एकत्र चित्रपट ‘हम साथ साथ हैं’ यामध्ये तब्बूच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. राजीव वर्मा आणि अमिताभ बच्चन यांनीही एक चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
या चित्रपटात होते राजीव वर्मा आणि अमिताभ बच्चन
राजीव वर्मा आणि अमिताभ बच्चन यांनी कधी एकत्र चित्रपटात काम केलंय का असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याचं उत्तर आहे हो… ‘बुड्ढा होगा तेरा बाप’ आणि ‘आरक्षण’ या दोन्ही चित्राट राजीव वर्मा तसेच बिग बी यांची भूमिका होती. मात्र राजीव वर्मा यांनी त्यांची मेहुी जया बच्चन यांच्यासोबत कधीच एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाही.
होशंगाबादचे रहिवासी असलेले राजीव वर्मा यांनी भोपाळमध्ये थिएटर केले आणि याच दरम्यान त्यांची रीटा यांच्याशी भेट झाली. यादरम्यान त्यांच्यात प्रेम वाढले आणि त्यानंतर 3 वर्षांच्या अफेअरनंतर रीटा आणि राजीव यांनी 1976 मध्ये लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, राजीव वर्मा हे आधी आर्किटेक्ट होते पण नंतर ते अभिनेता बनले. तर रीटा या शिक्षिका आहेत. त्या दोघांना दोन मुलं आहेत.
राजीव यांनी वयाच्या 38 व्या वर्षी चित्रपटात प्रवेश केला. राजीव हे अनुभवी कलाकार असून ते वर्षानुवर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत दिसले आहेत.‘हम दिल दे चुके सनम’, ‘कोई मिल गया’, ‘कच्चे धागे’, ‘हिम्मतवाला’, ‘चलते चलते’ आणि ‘क्या कहना’ यासह अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये राजीव वर्मा यांनी काम केलं आहे.