‘स्त्री 2’ नाही तर हा आहे 2024 मधील सर्वात हॉरर मुव्ही, पाहाताना फुटेल दरदरून घाम, काहींनीतर अर्धाच चित्रपट पाहिला!

| Updated on: Nov 22, 2024 | 6:42 PM

2024 चं हे वर्ष संपण्यासाठी आता अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. मनोरंजन क्षेत्राबाबत बोलायचं झाल्यास हे संपूर्ण वर्ष हॉरर आणि कॉमेडी चित्रपटांनी चांगलंच गाजवलं.

स्त्री 2 नाही तर हा आहे 2024 मधील सर्वात हॉरर मुव्ही, पाहाताना फुटेल दरदरून घाम, काहींनीतर अर्धाच चित्रपट पाहिला!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

2024 चं हे वर्ष संपण्यासाठी आता अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. मनोरंजन क्षेत्राबाबत बोलायचं झाल्यास हे संपूर्ण वर्ष हॉरर आणि कॉमेडी चित्रपटांनी चांगलंच गाजवलं. बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंत एकापेक्षा एक हिट कॉमेडी आणि हॉरर चित्रपट चालू वर्षामध्ये प्रदर्शीत झाले. या चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर प्रचंड धुमाकूळ घातला. अपेक्षेपेक्षाही अधिक कमाई केली. स्त्री 2 या हॉरर चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरूप प्रतिसाद दिला, हा चित्रपट जरी भयपट असला तरी तो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. मात्र या वर्षी स्त्री 2 पेक्षाही एक अधिक भयावह चित्रपट प्रदर्शीत झाला आहे. तो चित्रपट पाहात असताना प्रेक्षकांना दरदरून घाम फुटला.मात्र तरी देखील या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अवघ्या 15 कोटी रुपयांमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती, या चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर 85 कोटी रुपयांचा गल्ला जमावला.

आज आपण ज्या चित्रपटाबाबत बोलत आहोत, तो एक भयपट आहे. या चित्रपटासाठी निर्मात्याला 15 कोटी रुपयांचा खर्च आला तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 85 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट एवढा भयानक होता की या चित्रपटातील दृश्य पाहात असताना प्रेक्षकांमध्ये भीती आणि उत्सुकतेची समीश्र भावना दिसून येत होती,हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून आम्ही डेमोंटे कॉलोनी 2 या चित्रपटाबद्दल बोलत आहोत.

2015 मध्ये प्रदर्शीत झाला होता पहिला भाग

आर. अजय ज्ञानमुथु यांची निर्मिती असलेला डेमोंटे कॉलोनी 2 हा चित्रपत या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये प्रदर्शीत झाला. हा चित्रपट म्हणजे तामिळ भाषेत बनलेला एक सुपरनेचरल हॉरर चित्रपट आहे. हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात या घटनेला काल्पनिक रूप देण्यात आलं आहे. डेमोंटे कॉलोनीचा पहिला भाग हा 2015 साली रिलीज झाला होता, ज्याचं बजेट केवळ दोन कोटी रुपये इतकं होतं. त्याने बॉक्स ऑफिसवर 65 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता.तर या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याचाच दुसरा पार्ट रिलीज झाला आहे, पंधरा कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर 85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

डेमोंटे कॉलोनी 2 चं कथानक

या चित्रपटाची कथा अशी आहे की, आपला पती आता या जगात नाही, यावर एका महिलेचा विश्वासच नसतो. त्यानंतर तीला असा भास होतो की तीचे पती तिच्या आसपासच आहेत. त्यानंतर ती तीच्या पतीच्या आत्म्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर या चित्रपटात अनेक मोड येतात. एकदा आवश्य पाहावा असा हा चित्रपट आहे.