मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut) हिला ‘कॉन्ट्रोवर्सी क्वीन’ म्हटले जाते. बऱ्याचदा ती असे काही बोलते ज्यामुळे वाद निर्माण होतात किंवा तिच्याविरूद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर पुन्हा पुन्हा चर्चेत येते. अलीकडेच अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरूद्ध द्वेषयुक्त भाषण दिल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. द्वेषयुक्त भाषण दिल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते रिजू दत्ता (Riju Dutta) यांनी कंगनाविरोधात कोलकाताच्या उल्टाडांगा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे (TMC spokesperson Riju Dutta file complaint against kangana ranaut).
रिजू यांनी आपल्या एफआयआरची एक प्रत ट्विटरवरही शेअर केली आहे. तक्रारीची कॉपी शेअर करण्याबरोबरच त्यांनी लिहिले की, “मी कंगना रनौत यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. कारण ती बंगालमध्ये जातीय हिंसा भडकवण्याबद्दल द्वेष पसरवत आहे आणि त्याचवेळी ममता बॅनर्जी यांची प्रतिमा खराब करत आहे.” रिजू यांनी तक्रारीतही कंगना रनौत यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.
I have filed an FIR against Ms. Kangana Ranaut for spreading “Hate Propaganda to incite Communal Violence” in Bengal and distorting the image of our Hon’ble CM – @MamataOfficial !!
She shared from her official Instagram acc: https://t.co/Fvqmb5Tcb3
Check her story and RT !! pic.twitter.com/yhl8sjnvG4
— Riju Dutta । ঋজু দত্ত (@DrRijuDutta_TMC) May 6, 2021
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून कंगना टीएमसीविरोधात विविध प्रकारचे ट्विट करत होती. भाजपला पाठिंबा देत कंगना उघडपणे टीएमसीवर निशाणा साधत होते. गँगरेपचा आरोप करत कंगनाने टीएमसीविरोधात ट्वीट केले होते, त्यानंतर ट्विटरने तिचे खाते निलंबित केले गेले होते. कंगनाचे खाते आता कायमचे निलंबित करण्यात आले आहे (TMC spokesperson Riju Dutta file complaint against kangana ranaut).
आपले खाते निलंबित झाल्यावर कंगनाने आपला व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओमध्ये कंगना म्हणाली होती की, ट्विटरने माझे म्हणणे सुरुवातीपासूनच खरे केले आहे की, ते सुरुवातीपासूनच अमेरिकन आहेत. माझ्याकडे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जिथे मी आवाज उठवू शकते. याशिवाय मी सिनेमाद्वारेही माझा मुद्दा सिद्ध करेन.
कंगनाच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, ती लवकरच ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत नेत्या जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, जो खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रत्येकजण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.
(TMC spokesperson Riju Dutta file complaint against kangana ranaut)
नितीन देसाईंच्या ND स्टुडिओत भीषण आग, ‘जोधा अकबर’च्या किल्ल्याचा सेट भक्ष्यस्थानी