बॉलिवूडचे बडे कलाकार, ज्याच्या घरांची किंमत काही कोटींमध्ये आहे
काही कलाकार असे आहेत की ज्यांच्या घरांची किंमत काही कोटी इतकी आहे. त्याचे घर जितके आलिशान तितके त्याच्या घरातील फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूही महागड्या असतात. यातील काही कलाकार सोशल वर्कही मोठ्या प्रमाणात करतात.
1 / 9
शाहरुख खान : महागड्या घरात राहणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान सर्वात आघाडीवर आहे. वांद्रे येथे 'मन्नत' नावाच्या बंगल्यात शाहरुख खान आपली पत्नी गौरी आणि आर्यन, सुहाना, अब्राहम या मुलांसह राहतो. 'मन्नत' बंगला हा एक आलिशान महाल आहे. त्याची किंमत 200 कोटींच्या आसपास आहे.
2 / 9
अमिताभ बच्चन : सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन हे 'जलसा' बंगल्यात रहातात. मुंबईत जुहू इथे त्यांचा जलसा बंगला आहे. जलसा दुमजली इमारत आहे. त्याची किंमत जवळपास 120 कोटींच्या घरात आहे. पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय, नात आराध्या हिच्यासोबत राहतात.
3 / 9
सलमान खान : बांद्रे येथील बँडस्टँडमध्ये सलमान खान याचा गॅलेक्सी हा अत्यंत आलिशान बंगला आहे. सलमान खान हा आपल्या कुटुंबियांसह गॅलेक्सीमध्ये राहतो. भाईजान सलमान याच्या गॅलेक्सीची किमत 100 कोटींच्या जवळपास आहे.
4 / 9
हृतिक रोशन : 'कहो ना प्यार है' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या हृतिक रोशन याला रातोरात सुपरस्टार बनवले होते. गेली 24 वर्ष ह्रतिक रोशन हा 'एव्हरग्रीन क्रश' म्हणून ओळखला जातो. हृतिक रोशन याच्या मालकीचा जुहू येथील समुद्राचा खास नजराणा दाखवणारा पारस या बंगल्याची किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक आहे.
5 / 9
अक्षय कुमार : खिलाडी अक्षय कुमार याचे घर आलिशान आणि समुद्राभिमुख आहे. यात विस्तीर्ण बाग आहे. पत्नी ट्विंकल खन्ना हिने हे घर सजविले आहे. त्याच्या मुख्य स्थानासह, आकर्षक अंतर्भाग आणि घराबाहेरील बुद्धासारखे स्टेटमेंट आर्ट पीस अक्षय कुमारच्या घराची शोभा वाढवितात. जुहू तारा या अक्षयच्या बंगल्याची अंदाजे 80 कोटी किंमत आहे.
6 / 9
जॉन अब्राहम : अभिनेता जॉन अब्राहमच्या मालकीचे मुंबईत वांद्रे येथे 'विला इन द स्काय' हे आलिशान पेंटहाऊस आहे. भाऊ एलन अब्राहम याने घराची डिझाईन केली आहे. या घरची किंमत जवळपास 60 कोटी इतकी आहे.r
7 / 9
अजय देवगन : अजय देवगण आणि काजोल यांचा जुहू येथे 'शिवशक्ती' बंगला आहे. या बंगल्यासाठी जवळपास 60 कोटी खर्च आला आहे.
8 / 9
शाहिद कपूर : शाहिद आणि मीरा कपूर या बॉलिवूडच्या पॉवर कपलचे घर वरळी परिसरात आहे. त्याची किंमत 58 कोटींच्या घरात आहे.
9 / 9
रणवीर कपूर : दीपिका पदुकोण आणि रणवीर कपूर ही जोडीही महागड्या घरात राहते. प्रभादेवी येथील ब्युमोंडे टॉवर्स या मुंबईतील सर्वात महागड्या अपार्टमेंटमध्ये ते राहतात. 4 BHK अपार्टमेंटची किंमत जवळपास 42 कोटी इतकी आहे. 'वास्तू' हे नाव त्याने आपल्या घराला दिले आहे.