मुंबई | 31 जुलै 2023 : अनेक रिॲलिटी शोचा स्पर्धक असलेल्या राहुल महाजनचं (Rahul Mahajan) वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत आलं आहे. राहुल त्याच्या पत्नीशी घटस्फोट (divorce) घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. कझाकिस्तानी मॉडेल नताल्या इलीनाशी (Natalya Ilina) त्याचं लग्न संपुष्टात आलं असून दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेता आहे. एक रिपोर्टनुसार, पाच वर्षं लग्न निभावल्यानंतर या जोडप्याने गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. यापूर्वी राहूलची दोन लग्नं झाली होती, मात्र काही वर्षांतच त्याचा संसार मोडला होता.
राहुल व नताला या जोडप्याच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्येही पहिल्यापासूनच अनेक मतभेद होते, मात्र त्यांनी नातं निभावण्याचा प्रय्तन अनेक वर्ष केला. पण गेल्या वर्षी दोघेही वेगळे झाले आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. गेल्या वर्षी दोघांनी कागदपत्रांची पूर्तता केली होती, त्यांचा घटस्फोट झाला आहे की त्याची प्रोसेस अद्याप सुरू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, ट
नताल्या ही राहुलची तिसरी पत्वी आहे. यापूर्वी त्याचे पहिले लग्न श्वेता सिंह हिच्याशी झाले, ते दोघं 2006-2008 पर्यंत एकत्र होते. नंतर ते वेगळे झाले. नंतर ‘राहुल दुल्हनिया ले जाएगा’ या रिॲलिटी शो मध्ये त्याची ओळख डिंपी गांगुली हिच्याशी झाली. 2010 साली त्यांनी लग्न केलं, मात्र 2015 त्यांचा घटस्फोट झाला.
राहुल महाजन पुन्हा प्रेमाच्या शोधात
राहुलच्या एका जवळच्या मित्राच्या सांगण्यानुसार, तिसऱ्यांदा घटस्फोट झाल्यानंतर राहुलची तब्येत ठीक नाही. ब्रेकअप मुळे तो पूर्णपणे तुटला होता. मात्र आता तो ठीक आहे. सगळं परत नीट व्हावं यासाठी तो प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी त्याची मनस्थिती ठीक नव्हती. पण आता तो पुन्हा प्रेमाच्या प्रतीक्षेत आहे. मागच्या काही अनुभवांमुळे त्याने आता खासगी जीवनाबद्दल काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला आहे..
घटस्फोटाच्या वृत्तावर राहूल – नताल्याचे मौन
घटस्फोटाच्या बातमीबाबत राहुलने नकार दर्शवला नाही किंवा त्याची पुष्टीही केली नाही. ‘ मला माझं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायचं आहे. मी कोणत्याही गोष्टीबाबत कमेंट करू इच्छित नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मी माझ्या मित्रांशीही बोलत नाहीये’ असं त्याने सांगितलं. तर नताल्यानेही याविषयाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. राहुल महाजन आत्तापर्यंत अनेक रिॲलिटी शो मध्ये झळकला आहे. तो नताल्यासोबत ‘स्मार्ट जोडी’मध्ये शेवटचा दिसला होता.