मुंबई : परभणीचं नाव मनोरंजन विश्वात गाजवणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade). चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकताच त्याच्या ‘तू म्हणशील तसं…’ या नाटकाचे 100 प्रयोग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने त्याने एक खास आठवण प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. ही घटना जरी वर्षभरापूर्वीची असली, तरी प्रेक्षक संकर्षणच्या धाडसाचं खूप कौतुक करत आहेत (Tu mhanshil Tas fame actor sankarshan karhade share foot injury memory on special occasion).
संकर्षणनं शेअर केलेली ही आठवण आहे ‘तू म्हणशील तसं…’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीची! ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता संकर्षणच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तसाच, दुखापतग्रस्त पाय घेऊन त्याने आपल्या नाटकाचा संपूर्ण प्रयोग पूर्ण केला होता. एक वर्षापूर्वीची ही आठवण संकर्षणने 100च्या खास निमित्ताने सोशल मीडियावर शेयर केली आहे.
#तूम्हणशीलतसं ❤️ च्या 100व्या प्रयोगा निमित्ताने ; “आठवण क्र. 3..” “हि घटना 1 वर्ष जुनी आहे …….” आठवण म्हणुन शेअर करतोय.. तारीख 20 जाने. 2020. वाशी चा प्रयोग. नाटक ओपन होऊन बरोब्बर महिना झाला होता. आमच्या नाटकामध्ये धावपळ थोडी जास्तं आहे.
माझं पात्रं अवखळ असल्यामुळे काही मुव्हमेंट्स आमचा दिग्दर्शक @oakprasad दादा ने जरा fast दिल्या आहेत. त्यातली एक टेबलावर ऊडी मारायची मुव्हमेंट करतांना माझा पाय स्टेजवर मुरगळला आणि स्वत:ला सावरून मी उठे पर्यंतच; टेनीस चा बॉल पायाच्या घोट्यात ठेवलाय की काय.. असं वाटावं इतका पाय सुजला. अगदी काही क्षणांत. तो प्रयोग तसाच थोडा लंगडत केला.
रात्री पुण्यात आलो कारण, दुसरे दिवशी दुपार 12.30 आणि संध्याकाळ 5.30 असे दोन प्रयोग होते. मग मी रात्रीच 12.30 वा. संचेती हॉस्पिटल ला गेलो. डॉक्टरांनी X Ray काढला (Tu mhanshil Tas fame actor sankarshan karhade share foot injury memory on special occasion).
“हेअर लाईन क्रॅक, स्वेलींग, रेस्ट, ऑपरेट, प्लास्टर..” ह्या सगळ्या शब्दांचा वापर करुन ते भलं मोठं काहीतरी सांगत होते.. मी डायरेक्ट एवढंच विचारलं, उद्या दोन प्रयोग करता येतील असं काहीतरी सांगा. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊन रात्री झोपलो आणि सकाळी पलंगाच्या खाली पायच ठेवता आला नाही. मला घाम फुटला. थिएटरला जाण्याआधी परत गोळ्या घेतल्या….. आणि प्रयोग सुरु केला. त्या particular उडीच्या मुव्हमेंटला जिथे मला काल लागलं होतं.. आज सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट सुद्धा विंगेत येऊन थांबले होते.
पण, दोन्ही प्रयोग सुरळीत आणि मस्तं झाले. नंतर काही दिवसांची gap होती. आराम केल्यावर सूज पण गेली आणि पाय दुखला पण नाही.’ केवळ नाटकाची ओढ आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या कलाकाराने चक्क स्वतःच्या पायाची आणि त्या दुखापतीचीही पर्वा केली नाही. त्याच्या या धासाचे सगळे प्रेक्षक कौतुक करत आहेत.
हेही वाचा :
Video | नेहा कक्करच्या घरी होळी पार्टी, रोहनप्रीतसह पूल डान्स सोशल मीडियावर चर्चेत, पाहा व्हिडीओ…
आमीर खानचा आदर्श घेत ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा सोशल मीडियाला ‘गुडबाय’!