मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत 22 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; अभिनेता म्हणाला ‘लग्न वैगरे…’

| Updated on: Jan 10, 2025 | 1:12 PM

एक प्रसिद्ध कपल गेल्या 22 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत असूनही त्यांनी अजून लग्न केलेलं नाही. याची कारण फार वेगळी आहेत. तसेच त्यांचा फक्त प्रेमाचा नाही तर अध्यात्माचाही प्रवास फारच रंजक आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत 22 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; अभिनेता म्हणाला लग्न वैगरे...
Follow us on

आजकाल सेलिब्रिटींचे लिव्ह इनमध्ये राहणं अगदीच नॉर्मल झालं आहे. अनेकजण आता शक्यतो लग्नाआधी लिव्ह इनमध्येच राहताना दिसतात. लिव्ह इनमध्ये राहत असताना काहीजणांचे नाते लग्नापर्यंत जातं तर काहींच नाही. पण असं एक कपल आहे जे गेल्या 22 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत आहेत.

लिव्ह इनमध्ये असूनही लग्न का नाही?

हे कपलं टिव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोडी आहे. जे गेल्या 22 वर्षांपासून एकत्र राहत आहेत पण अजूनही त्यांनी लग्न केलेलं नाही. लोकप्रिय टीव्ही अभिनेता संदीप बसवाना आता ‘अपोलीना’ मालिकेत दिसत आहे. दोन दशकांहून जास्त काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या संदीपने एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, पण तो चित्रपट फ्लॉप झाला.

एका मुलाखतीत त्याने टीव्हीवर पुनरागमन करण्याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा त्याने त्याच्या रिलेशनशिपवरही भाष्य़ केलं होतं. 47 वर्षीय संदीप मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचं त्यांने सांगितले. संदीप अभिनेत्री अश्लेषा सांवतबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय. मागील 22 वर्षांपासून ते एकत्र आहेत. त्याने या मुलाखतीत अश्लेषाबरोबरच्या नात्यावरही भाष्य केलं.

लिव्ह इन ते अध्यात्म असा प्रवास 

तो त्यांच्या नात्यावर आणि लग्नावर भाष्य करताना म्हणाला, “मी वर्तमानात जगतो. मी आत्ता लग्न करत नाहीये, पण लग्न करो वा नाही, मी कायम माझ्या जोडीदारासोबत असतो. कदाचित भविष्यात माझे लग्नही होईल. खरं तर इथे आपण पेपर वर्कला खूप महत्त्व देतो. मी कदाचित या कारणांसाठी लग्न करेनही, पण यासाठी करणार नाही की मला 10 लोकांना सांगायचंय की ही माझी पत्नी आहे. जर मी अध्यात्माकडे जात असेल पण त्यात ती नसेल तर मग त्याला अर्थ नाही. बरेच लोक म्हणतात तू मुंबईत का आला होतास. मी स्पष्ट सांगतो की मी मजा करायला आलो होतो. मला पार्टी करायची होती आणि सुंदर मुलींच्या आजूबाजूला राहायचं होतं. मला जगायचं होतं. ते हरियाणात शक्य नव्हतं म्हणून मी मुंबईत आलो. मला इथे खूप मजा आली. मग त्याचाही कंटाळा आला आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात अध्यात्म आले. आता अध्यात्मामुळे मी आयुष्यात पळवाट शोधत नाही,” असं म्हणत संदीपने त्याचं मत स्पष्टच सांगितलं आहे.


22 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये

अश्लेषा आणि संदीप यांची प्रेमकहाणी कशी सुरु झाली याबद्दल सांगताना तो म्हणाला, “माझी आणि अश्लेषा सावंतची भेट ‘कमल’ या शोमध्ये झाली होती. त्यावेळी ती 18 वर्षांची होती आणि माझे वय २४ वर्षे होते. मला आज हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे किंवा नंतर मुलं हवी आहेत असं आमचं नव्हतं. ती माझ्याकडे बघून म्हणायची की तू तुला जे करायचं आहे ते कर, मी तुझ्यासोबत आहे. मला फक्त तुझी सोबत हवी आहे. जवळपास 22 वर्षे झाली आम्ही एकत्र आहोत. आम्ही आयुष्यात जे पाहिलं ते सगळं एकत्रच पाहिलंय. पूर्वी अश्लेषाला ध्यानात रस नव्हता. मी 2010 मध्ये पहिल्यांदा ध्यानासाठी गेलो. त्यानंतर मी 2014-2015 मध्ये अश्लेषाला धर्मशाळेतील ओशो आश्रमात घेऊन गेलो. ते तिला खूप आवडलं. मला आता मरण आलं तरीही काहीच फरक पडत नाही, पण प्रेम मात्र असायला हवं, अशा विचारांची ती आहे,” असं संदीप बसवानाने सांगितलं.

 टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पुन्हा परतण्याचं कारण…

लेखन-दिग्दर्शनात केलेला प्रयत्न फोल ठरल्यानं बरंच नुकसान झाल्याचं त्याने संदीपने म्हटलं. तसेच आता पुन्हा एकदा टीव्हीमध्ये खरा पैसा असल्याचं म्हणत पुढे टिव्हीमध्येच काम करणार असल्याचही त्याने म्हटलं आहे.