मुंबई | 22 जुलै 2023 : अतरंगी फॅशन सेन्स आणि बेधडक वक्तव्य ही उर्फी जावेदची (Urfi Javed) खासियत आहे. आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही तरूणांनी विमानात उर्फीची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे. स्वत: उर्फीनेच सोशल मीडियावर फॅन्सना ही माहिती दिली आहे.
अतिशन बिनधास्त आणि बोल्ड पर्सनॅलिटीसाठी उर्फी प्रसिद्ध आहे. मात्र फ्लाइटमध्ये झालेल्या या छेडछाडीमुळे ती अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी द्वारे या घटनेची माहिती दिली आहे.
‘ काल मुंबईहून गोव्याला फ्लाईटमधून जात असताना मला छेडछाडीचा सामना करावा लागला. या व्हिडीओत दिसणारे जे पुरूष आहेत, ते घाणरेडं बोलत होते. छेड काढत होते आणि (माझं) नाव घेत होते. मी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असतात, त्यापैकी एकाने सांगितलं की मित्र नशेत आहेत. मद्यपान करणं किंवा नशेत असणं ही काही महिलांची छेड काढण्याची सबब असू शकत नाही. मी पब्लिक फिगर आहे, पब्लिक प्रॉपर्टी नव्हे ‘ अशा शब्दांत उर्फीने तिचा भयानक अनुभव शेअर करत महिलांची छेड काढणाऱ्यांना फटकारले आहे.
उर्फी ही इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत होती, तेथेच या मुलांचा एक ग्रुपही होता. मी पब्लिक फिगर आहे, याचा अर्थ मी सार्वजनिक मालमत्ता आहे, असा होत नाही, असेही तिने नमूद केले.