Uorfi Javed Revealed About Dressing Sense : अजब कपडे, अतरंगी स्टाइल यामुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) कायमच चर्चेत असते. बऱ्याच वेळा ती त्यामुळे ट्रोलही (trolling) होते. टेलीफोन वायर पासून ते पिझ्झा स्लाइस आणि च्युइंग गम पर्यंत अनेक गोष्टींनी बनलेले ड्रेस उर्फी घालत असते. यामुळे तिला सोशल मीडियावर बऱ्याच वेळेस ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. सध्या ती ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये दिसत असून, तिथेच तिन इतर स्पर्धकांसोबत बोलताना तिच्या चित्र-विचित्र फॅशन सेन्सबद्दलही काही गोष्टी सांगितल्या.
आपण एक्स्ट्रा रिव्हिलिंग कपडे का घालतो याबद्दल बोलताना उर्फीने तिच्या स्ट्रगल फेजबद्दलही सांगितले. ती जेव्हा एका आठवड्यातच बिग बॉसमधून आऊट झाली तेव्हा आयुष्यचं संपलं, असं तिला वाटलं होतं. मी आयुष्यात आत्तापर्यंत काही केलेच नाही, असं मला वाटलं होतं. 7 लोकांमध्ये मी एकटीच कमावणारी होते, मी आता पुढे काय करू, माझं घर कसं चालेल, मला आता कोणीच काम देणार नाही, असं मला तेव्हा वाटलं होतं, अशी आठवण उर्फीने शेअर केली.
माझे घरचे खुश, तर मी खुश
माझ्या कपड्यांमुळे मला अटेन्शन मिळतंय, हे माझ्या हळूहळू लक्षात आलं. त्यामुळे मी त्याचा फायदा घ्यायचा ठरवला असं उर्फीने सांगितलं. ‘ ज्या गोष्टीमुळे मला माझं घर (खर्च) चालवायला मदत मिळत आहे, दोन वेळचं जेवण मिळत आहे, माझे घरातले लोक, मी खुश आहे, ती (गोष्ट) योग्य आहे’असं मला वाटलं, असं उर्फीने नमूद केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यावर उर्फी नेहमीप्रमाणे ट्रोल नाही झाली, उलट तिचा प्रामाणिकपणा पाहून चाहते खूप खुश झाले, त्यांनी तिचं कौतुकही केलं.
कपड्यांमुळे मिळत नाही घर!
यापूर्वीही अनेकवेळा उर्फी तिच्या स्ट्रगलबद्दल बोलली आहे. एका मुलाखतीत उर्फी म्हणाली होती की, इंटरनेट सेन्सेशन असूनही तिला तिच्यासाठी एक चांगलं घर शोधणंही कठीण झालं होतं. ती सध्या एका वन बीएचके फ्लॅटमध्ये कशीबशी रहात आहे. मुसलमान असूनही असे कपडे घातल्याने अनेक जण तिला घर देण्यास नकार देतात, असा खुलासाही उर्फीने केला होता.