मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते परंतु तिने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, यामुळे तिचे चाहते चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. या फोटोत उर्वशी खूपच वेगळी दिसत आहे. सध्या उर्वशी रिषभ पंतसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. मात्र, आता तिने जो फोटो शेअर केला आहे, त्यात तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. यामुळे तिने गुपचूप लग्न उरकले की काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे (Urvashi Rautela share photo wearing mangalsutra and sindoor photo).
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू आणि साडी असा एखाद्या विवाहित महिलेचा सोज्वळ लूक दिसत आहे. रिषभ पंतबरोबर नाते तुटल्याने तिने लग्नाचे पाऊल उचलले का?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
शनिवारी अर्थात 3 एप्रिल रोजी उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत उर्वशी रौतेलाने गळ्यात मंगळसूत्र घातले असून, डोक्यावर सिंदूर लावले आहे. त्यात तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. फोटोमध्ये उर्वशी काहीतरी विचार करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मला एक वाईट सवय आहे जी, आजकाल सर्वांच्या आवडीची नाही. मी जे बोलते ते पूर्ण करते.’(Urvashi Rautela share photo wearing mangalsutra and sindoor photo)
काही दिवसांपूर्वी रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या अफेअर्सच्या चर्चा मोठ्या जोरात सुरु होत्या. आता खुद्द उर्वशीनेच या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशीच्या एका फॅन्सने तिला इन्स्टाग्रामवर तुझा आवडता क्रिकेटर्स कोण आहे?, असा प्रश्न विचारला. त्यावर तिने उत्तर दिलं, मी क्रिकेट अजिबात बघत नाही. त्यामुळे मी क्रिकेटर्सला फारसं ओळखत नाही. असं सांगताना मात्र तिने सचिन सर आणि विराट सर यांचा मी खूप आदर करते, असं सांगायला विसरली नाही.
रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांना 2019 साली मुंबईच्या जुहूमधील एका हॉटेलमध्ये जाताना काही फॅन्सनी पाहिलं होतं. लेट नाईट डिनरसाठी रिषभ आणि रौतेला हॉटेलमध्ये गेले होते. ज्यानंतर त्यांच्यात खास रिलेशन असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. रौतेला आणि रिषभचे काही फोटोज देखील त्यावेळी व्हायरल झाले होते. यानंतर मीडिया रिपोर्टनुसार, रिषभने कानाला खडा लावत उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर त्यांची भेट झाली नाही.
रिषभ पंत श्रीलंका दौऱ्यावर होता. मात्र तिथे त्याचा परफॉर्मन्स म्हणावा असा होत नव्हता. त्यामुळे अंतिम 11 मध्ये त्याची जागा फिक्त होत नव्हती. याच टेंशनमधून त्याने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं, अशी चर्चा आहे.
(Urvashi Rautela share photo wearing mangalsutra and sindoor photo)
Bollywood Corona | कलाकारांच्या मागे कोरोनाचे शुक्लकाष्ट, आदित्य नारायण-श्वेतालाही कोरोनाची लागण!
Vicky Kaushal | विकी कौशल साकारणार ‘सॅम मानेकशॉ’, पुन्हा एकदा दिसणार जबरदस्त ‘आर्मी’ लूक!