मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आज दुपारी खारच्या हिंदुजा रुग्णालयातून घरी परतले. त्यांची प्रकृती ठिक आहे. तब्येतीबाबत आता काळजी करण्यासारखे काही नाही. दिलीप साहब यांच्यासाठी तुमच्या सदिच्छा, तुमची प्रार्थना कायम राहू दे, असे दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दुपारी सांगितले. 98 वर्षीय दिलीप कुमार यांना दोन दिवसांपूर्वी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येतीबाबत काही त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले. नियमित उपचार करण्यात आले तसेच काही वैद्यकीय चाचण्याही केल्या. सर्व चाचण्यांचे रिपोर्ट चांगले असून काही काळजी करण्यासारखे नसल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. (Veteran actor Dilip Kumar discharged from hospital)
दिलीप कुमार यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. ते दोन दिवस रुग्णालयात राहिले, असे सायरा बानो यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. त्यांनी शनिवारीदेखील दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत अपडेट कळवला होता. ईश्वराच्या कृपेने सर्व ठिक झाले तर आम्ही रविवारीच खारच्या हिंदुजा रुग्णालयातून दिलीप कुमार यांना घरी घेऊन जाऊ, असे त्या म्हणाल्या होत्या. दिलीप कुमार यांना हिंदुजा नॉन कोविड रुग्णालयात दाखल केले होते. मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता कोणत्याही कारणावरून रुग्णालयात जाणे धोकादायक आहे. दिलीप कुमार बरे होऊन लवकरच सुरक्षित घरी परततील, अशी आशा सायरा बानो यांनी शनिवारी व्यक्त केली होती.
98 वर्षीय दिलीप कुमार हे अजूनही सोशल मीडियात सक्रीय आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांना, नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. कोरोना महामारीने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून लोकांना आवाहन केले होते. ‘स्टेसेफ एव्हरीबडी’ असे ट्विट त्यांनी केले होते.
दिलीप कुमार हे असंखय चित्रपटशौकिनांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ त्यांनी चांगलाच गाजवला होता. त्यांच्या अनेक भूमिका संस्मरणीय आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी कोणतीही बातमी पुढे येताच चाहत्यांची काळजी वाढते. ठिकठिकाणाहून चाहते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत वेळीच सुधारणा व्हावी, यासाठी परमेश्वरापुढे हात जोडतात. सध्याच्या कोरोना काळात दिलीप कुमार हे रुग्णालयात दाखल झाल्यामुळे चाहते प्रचंड काळजीत सापडले होते. अखेर दिलीप कुमार हे सुखरुप घरी परतल्याची बातमी कळताच चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. (Veteran actor Dilip Kumar discharged from hospital)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचे अल्पशा आजाराने निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वासhttps://t.co/R2rvjy9rTD#Congress |#CongressLeader | #DamodarShingada
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
इतर बातम्या
कोरोना रुग्णांना मोठा दिलासा; ऑक्सिजन बेडसाठी केंद्राने घेतला ‘हा’ निर्णय