मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन (Senior Actor Ramesh Deo is no more) झालं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हृदयविकाराच्या धक्क्यानं (Heart Attack) त्याचं निधन झालं होतं. 30 जानेवारीला रमेश देव यांचा वाढदिवस झाला होता. अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना रमेश देव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्यासोबत अशोक सराफ यांचं फोनवरुन बोलणं झालं होतं. मराठीसोबत हिंदी सिनेमातही अनेक महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी वढवल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली असल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांसह दिग्गजांनी व्यक्त केली आहे.
चित्रपटसृष्टीमध्ये असे काही अभिनेते (Actor) असतात ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपट या एकाच गोष्टीसाठी दिलेलं असंत. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे त्यापैकीच एक होते. त्यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला समर्पित केली होती. 30 जानेवारील 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव (Ramesh Deo) यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीम देव) (Seema Deo) यांच्यासोबत लग्न केलं होतं.
या वर्षी रमेश देव आणि सीमा देव हे कपल आपल्या लग्नाचे 59 वर्षे पूर्ण करणार होतं. मात्र रमेश देव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांसन मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती. रमेश देव यांची पत्नी सीम देव यादेखील अल्झायमर या आजारानं त्रस्त असल्याची माहिती रमेश आणि सीमा देव यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी दिली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारण होण्यासाठी आपण प्रार्थना करावी, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
रमेश देव यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलेले आहे. रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रमेश देव यांनी दर्जेदार भूमिका वढवल्या होत्या.
Saddened to know about the demise of senior actor Shri Ramesh Deo. Shri Deo immortalized many characters with his great acting skills. My prayers for the departed soul??
— Governor of Maharashtra (@maha_governor) February 2, 2022
रमेश देव यांच्या निधनावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी बोलताना दुःख व्यक्त केलं आहे. 26 जानेवारी रोजी झालेल्या गप्पामध्ये रमेश देव यांनी आपल्याला शंभर वर्ष जगायचंय अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, वाढदिवशी जेव्हा अशोक सराफ यांच्यासोबत रमेश देव यांचं बोलणं झालं होतं, तेव्हा अशोक सराफ यांनाही रमेश देव यांचा आवाज बदलल्या बदलल्या सारखा आणि थकल्यासारखा जाणवला होता. अखेर दोन दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अशोक सराफ यांनाही धक्का बसला आहे.
रमेश देव- सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी फुलली ?
तारणहार! निवृत्त कर्नलचा जीव वाचवण्यासाठी Swiggy Delivery Boyने जे केलं, त्याला तोडच नाही