मुंबई : जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम (Tabassum) कोरोनाला पराभूत करून हॉस्पिटलमधून नुकत्याच घरी परतल्या आहेत. कोरोनामुळे त्या 9 दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. कोरोनाच्या या दुसर्या लाटेत काही मोठ्या सेलिब्रिटीच्या निधनाच्या बातम्या येत आहेत, त्याच अनुषंगाने तबस्सुम यांच्या निधनाच्या अफवांनाही उधाण आले आहे. ज्यानंतर दुःखी झालेल्या त्यांच्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विचारपूस आणि सांत्वन करणारे इतके फोन केले की अस्वस्थ झालेल्या तबस्सुम यांना स्वतःचा फोन बंद करावा लागला (Veteran Actress Tabassum death rumors spread actress gives official statement).
त्यानंतर 76 वर्षांच्या तबस्सुम यान स्वतःच्या तब्येतीची बातमी जाहीर करण्यासाठी माध्यमात निवेदन द्यावे लागले. काल रात्रीपासून ही घटना सुरू झाली असून, तेव्हापासून त्यांचा मुलगा होशांग गोविलच्या फोनवर शेकडो मिस कॉल आले आहेत. काही कॉलचे उत्तर देण्यासाठी जेव्हा त्याने या क्रमांकांवर संपर्क साधला, तेव्हा लोकांनी त्याला त्याची आई तबस्सुम यांच्या निधनाबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली. तर काही लोकांनी त्याला सांत्वनपार संदेशही दिले.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना तबस्सुम यांनी सांगितले की, जॉनी लीव्हर, अमित बहल, सुदेश भोसले आणि उषा खन्ना यांनी त्यांच्या मुलाला फोन करून, घाबरतच तब्येतीची चौकशी केली. उषा खन्ना यांनी या अफवांना सत्य मानून, तबस्सुम यांची आठवण काढून फोनवरच रडण्यास सुरुवात केली होती.
त्यांचा मुलगा होशांग याने सकाळी 7.30 वाजता तबस्सुम यांना झोपेतून जागे केले आणि असे फोन येत असल्याचे सांगितले. लोक त्यांच्या मृत्यूबद्दल खूप अफवा पसरवत असल्याचे सांगितले. तबस्सुम म्हणाल्या की, हे ऐकून मी मनाशी गमतीने म्हटले की, चला आता माझे वय आणखी वाढेल (Veteran Actress Tabassum death rumors spread actress gives official statement).
Aapki shubhkamnaon ki wajah se main bilkul theek hoon,tandurust hoon aur apne parivaar ke saath hoon. Ye jo rumour phail rahi hai mere baare mein woh bilkul ghalat hai, aur main yeh dua karti hoon ke aap sab bhi apne ghar mein safe rahein ? pic.twitter.com/UDuDrtIiea
— Tabassum (@tabassumgovil) April 23, 2021
जॉनी लीव्हर यांनी तबस्सुम यांना केला आणि त्यांचा आवाज ऐकताच म्हणाले, दीदी तुम्ही? तर तबस्सुम यांनी उत्तर दिले, हो, दीदी एकदम ठीक आहे. रेडिओचा सुप्रसिद्ध होस्ट अमिन सयानी यांनीही त्यांना फोन केला आणि त्यांच्याबद्दल अशीच काही माहिती घेतली. तबस्सुमने प्रत्येकाला त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली.
प्रसिद्ध टीव्ही शो ‘फूल खिल है गुलशन-गुलशन’सारखा तबस्सुम यांचा शो एका वेळी इतका लोकप्रिय झाला होता की, प्रत्येक आठवड्यात लोक त्यांचा कार्यक्रम टीव्हीवर येण्यापूर्वी तयार होऊन बसायचे. त्या त्यांच्या या शोमध्ये सेलिब्रिटींची मुलाखत घ्यायची आणि लोकांना त्यांच्या मजेदार गोष्टी ऐकून खूप आनंद व्हायचा.
सध्या देखील त्यांचा ‘तबस्सुम टॉकीज’ हा शो यूट्यूबचा सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम ठरला आहे. ज्याचे पाच लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. त्याच्या आधी त्यांना अल्झाइमर झाल्याची एक अफवा देखील मोठ्या प्रमाणात पसरली होती. मात्र, त्यांनी नेहमी स्वतः माध्यमांसमोर येत अशा अफवांचे खंडन केले होते.
(Veteran Actress Tabassum death rumors spread actress gives official statement)