मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर (Marathi Actor Avinash Kharshikar) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज (8 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता ठाण्यातील राहत्या घरी निधन झाले. अविनाश खर्शीकर जानेवारीपासून आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दीर्घकाळ आजारी असलेल्या अविनाश यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी श्रद्धांजली देत ही बातमी शेअर केली आहे.(Veteran Marathi Actor Avinash Kharshikar Passed Away)
अविनाश खर्शीकरची दुःखद exit ????
ॐ शांति ????— Renuka Shahane (@renukash) October 8, 2020
अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले होते. ‘बंदिवान मी या संसारी’ हा अविनाश खर्शीकर यांचा १९७८ साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट. तसेच ‘माफीचा साक्षीदार’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपली अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. ‘लफडा सदन’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘दिवा जळू दे सारी रात’ यांसारखी नाटके देखील त्यांनी गाजवली होती. अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते.(Veteran Marathi Actor Avinash Kharshikar Passed Away)
ज्येष्ठ अभिनेते श अविनाश खर्शीकर यांचं हृदय विकाराच्या झटक्याने आज सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी ठाणे येथे हे निधन झाले ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो ॐशांती ॐ शांतीॐ शांती:. pic.twitter.com/x8AVyZtIk4
— Vijay Kadam (@vijay4657) October 8, 2020
अविनाश खर्शीकरांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ घातली होती. मात्र, अनोख्या शैलीमुळे ते तरुणींच्या गळ्यातले ताईत बनले होते. 90च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांच्या लुकची देखील तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती. सदाबहार अविनाश खर्शीकर यांनी दैनंदिन मालिका ‘दामिनीत’ महत्त्वाची भुमिका साकारली होती. मराठी सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी अविनाश एक होते. ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात त्यांनी साकारलेली ‘श्याम’ची भूमिका विशेष गाजली होती. महाविद्यालयीन विद्यार्थी असणारा ‘श्याम’ ते वयाच्या 60व्या वर्षीदेखील तितक्याच ग्रेसफुली सादर करत होते.
मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन झाले. रंगभूमी, टिव्ही व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील एक मार्गदर्शक मित्र गमावला.भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/ADOxPZcpxs
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 8, 2020
रंगभूमी व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन झाले.त्यांची तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशीतैशी, वासूची सासू ही नाटके गाजली.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/2jBEiLIUVY
— Supriya Sule (@supriya_sule) October 8, 2020
(Veteran Marathi Actor Avinash Kharshikar Passed Away)