Ram Mandir | बिग बी, विकी-कतरिना ते रणबीर-आलिया.. भल्या पहाटे ‘या’ स्टार्सचे अयोध्येला प्रस्थान

| Updated on: Jan 22, 2024 | 8:38 AM

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. त्याचसाठी अनेक कलाकार या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, रविवारी अयोध्येत दाखल झाले. तर काही कलाकारांनी भल्या पहाटे अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले. अनेक कलाकारांचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. माधुरी दीक्षित, आलिया-रणबीर, विकी-कतरिना यांच्यासह अनेक स्टार्सचा त्यात समावेश आहे.

Ram Mandir | बिग बी, विकी-कतरिना ते रणबीर-आलिया.. भल्या पहाटे  या स्टार्सचे अयोध्येला प्रस्थान
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई | 22 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज होणरा आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशवासिय उत्सुक असून सगळेच सज्ज झाले आहेत. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. आज श्रीरामलल्ला आपल्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधू संतांसोबत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणार आहे.
या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्या नगरीसह संपूर्ण देशही सज्ज झाला आहे. या सोहळ्यासाठी देशातील विविध नामवंत उद्योजक, नामवंत नागरिक, खेळाडू तसेच बॉलिवू़डमधील अनेक कलाकारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. व्हीव्हीआयपीच्या आगमनामुळे अयोध्येत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस, निमलष्करी दलाबरोबर गुप्तचर संस्थांचे अधिकारी असणार आहे.

त्यापैकी काही सेलिब्रिटी या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच, रविवारी अयोध्येत दाखल झाले. तर काही बॉलिवूड कलाकारांनी आज, सोमवारी पहाटेच अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले. त्यामध्ये विकी कौशल- कतरिना कैफ, रणबीर कपूर- आलिया भट्ट, रणदीप हुड्डा, त्याची पत्नी लीन तसेच माधुरी दीक्षित व तिचे पती श्रीराम नेने यांचा समावेश आहे. पारंपारिक वेशभूषेत सेलिब्रिटी निघाले आहेत. माधुरी, कतरिना, आलिया यांनी सुंदर साडी नेसली असून त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हेही आज सकाळीच अयोध्येच्या दिशेने रवाना झाले.

अनेक खेळाडूंचीही उपस्थिती

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अयोध्येला जाण्यापूर्वी विमानतळावर स्पॉट झाला. या सोहळ्यासाठी सचिन, सुनील गावस्कर यांच्यासह अनेक खेळाडूंना निमंत्रण देण्यात आलं आहे. माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हाही अयोध्येत दाखल झाला असून त्यानेही बरेच फोटो शेअर केलेत. तर अनिल कुंबळेही कालच अयोध्येत पोहोचला होता.

 

दरम्यान काल संध्याकाळी विवेक ओबेरॉय, मधुर भंडारकर, कंगना रानौत, अनुपम खेर, शंकर महादेवन, सोनू निगम हे अयोध्या नगरीत दाखल झाले. अयोध्येला जाण्यापूर्वी अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट शेअर केली. ही पोस्ट तूफान व्हायरल झाली.