Vicky Kaushal | कोणतीही न्यूज शेअर करण्यासाठी विकी कौशल सगळ्यात पहिला फोन कोणाला करतो ?

| Updated on: Aug 26, 2023 | 4:48 PM

अभिनेता विकी कौशल हा फक्त त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळेच नव्हे तर पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. त्याची आणि कतरिना कैफची जोडी नेहमीच चर्चेत असते.

Vicky Kaushal | कोणतीही न्यूज शेअर करण्यासाठी विकी कौशल सगळ्यात पहिला फोन कोणाला करतो  ?
Follow us on

Vicky Kaushal On Love Life : बॉलिवूडमधील क्यूट कपल विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे दोघेही त्यांच्या चाहत्यांसाठी कपल गोल्स सेट करतात. ते दोघेही एकत्र दिसतात, तेव्हा चाहते खूप खुश होतात. कधी सोशल मीडियाच्या पोस्टमधून तर कधी मुलाखतींच्या माध्यमातून विकी आणि कतरिना दोघेही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण सार्वजनिकरित्या ते आपल्या पर्सनल लाइफबद्दल फारसे बोलताना दिसत नाहीत. मीडियासमोरही ते वैयक्तिक गोष्टी फारशा उघड करत नाहीत. विक्की कौशल हा नुकताच त्याच्या लग्नाबद्दल बोलत होता आणि ते आपल्या आयुष्यातील बेस्ट , सर्वोत्तम दिवस असल्याचे त्याने नमूद केले.

एका मुलाखतीदरम्यान विकीने त्याच्य आयुष्यातील खास क्षणांबद्दल सांगितले. विकीने सांगितले की जेव्हा त्याने त्याची पहिली ऑडिशन क्रॅक केली आणि आईला याबद्दल सांगितले तेव्हा तिने अक्षरश: नाचायला सुरुवात केली. यावेळी विकी नेहमीप्रमाणे त्याची पत्नी, कतरिनाबद्दलही बोलला.

सर्वात पहिले कतरिनाला करतो कॉल

मला जेव्हा कोणतीही बातमी, एखादी गोष्ट शेअर करायची असते तेव्हा मी सर्वात प्रथम कतरिनाला कॉल करतो, असे विकीने सांगितले. तसेच लग्नाचे ते तीन दिवस आपल्या आयुष्यातील बेस्ट दिवस होते, असेही नमूद करत त्याने त्या आठवणींना उजाळा दिला.

 

विक्की त्याच्या लव्ह लँग्वेजबद्दलही बोलला – मी एक टिपीकल पंजाबी आहे. मिठी मारणे हीच आमची लव्ह लँग्वेज किंवा प्रेम व्यक्त करण्याची भाषा असते.

विक्की – कतरिनाचं नातं

लग्नाच्या काही काळापूर्वीच विकी कौशल आणि कतरिना कैफच्या डेटिंगच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. मात्र दोघांनीही त्यावर मौन बाळगलं होतं. लग्नाचे कार्यक्रम सुरू होईपर्यंत दोघांपैकी कोणीही याबद्दल बोलले नाही. विकी आणि कतरिनाने लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. 2021 साली राजस्थानमध्ये त्यांनी शाही थाटात विवाह केला, ज्यासाठी काही कुटुंबीय आणि काही खास मित्र उपस्थित होते.