‘गाईड’ सिनेमानं विजय आनंद यांची करिअरमध्ये भरारी

| Updated on: Feb 23, 2022 | 6:00 AM

त्यांनी त्यांचं कॉलेज मुंबईल एका नामांकीत म्हणजे सेंट जेवियर्स कॉलेजमधून केलं. त्यावेळी विजय आनंद यांनी आणि त्यांच्या वहिनीनी एक स्क्रीप्ट लिहीली त्यावर टॅक्सी ड्राइव्हर हा चित्रपट आला.

गाईड सिनेमानं विजय आनंद यांची करिअरमध्ये भरारी
विजय आनंद
Follow us on

मुंबई – हिंदी सिनेमात (hindi cinema) करिअर (career) करण्यासाठी अनेकांना स्वातंत्र्यपुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई (mumbai) गाठली. कारण हिंदी सिनेमात करिअर करण्यासाठी सगळ्यांची मुंबईला अधिक पसंती होती. कारण त्या काळात सिनेसृष्टीतलं सगळं काही फक्त मुंबईत सुरू होतं. हिंदी सिनेमात एक असं नाव की ज्याचं नाव लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून आजही घेतलं जातं. तर चला मग आपण पंजाबमधील गुरदापूरमध्ये जन्म घेतलेल्या विजय आनंद यांच्याबाबत चर्चा करणार आहोत. कारण त्यांनी ज्या चित्रपटांना डायरेक्शन केलं त्यामुळे अनेक अभिनेत्यांचं करिअर झालं. 1934 मध्ये त्यांचा जन्म झाला होता, तर 2004 त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या काळात त्यांनी अनेक चांगल्या चित्रपटांना डायरेक्शन दिलं त्यामुळं आजही त्यांचं नाव चांगला डायरेक्टर म्हणून घेतलं.

टॅक्सी डाईव्हर पहिला चित्रपट 

विजय आनंद यांच्या वडिल प्रसिध्द वकील होते, ज्यावेळ विजय यांचं वय सात वर्षे असेल त्यावेळी त्यांच्या आई त्यांना सोडून गेली. त्यांच्यानंतर त्यांचं आयुष्य वहिनी आणि भावाच्या सानिद्यात गेलं. त्यांनी त्यांचं कॉलेज मुंबईल एका नामांकीत म्हणजे सेंट जेवियर्स कॉलेजमधून केलं. त्यावेळी विजय आनंद यांनी आणि त्यांच्या वहिनीनी एक स्क्रीप्ट लिहीली त्यावर टॅक्सी ड्राइव्हर हा चित्रपट आला. त्यावेळी टॅक्सी डाईव्हर डायरेक्शन चेतन आनंद यांनी केलं. या चित्रपटाला इतका प्रतिसाद मिळाला की, त्यामुळे त्यांना इंडस्ट्री ओळखायला लागली आणि त्यांना सिनेमातल्या अनेक गोष्टी समजल्या. त्यांच्यानंतर ‘काला बाजार’ आणि ‘तेरे घर के सामने’ हे चित्रपट आले, त्यांचे दोन चित्रपट त्या काळात प्रेक्षकांना इतके आवडले की, लोकांनी अक्षरश: त्यांना डोक्यावर घेतले. त्यामुळे त्यांचं हिंदी सिनेमात एक वेगळं स्थान निर्माण झालं.

‘गाइड’ सिनेमामुळे आनंद बंधु चर्चेत

‘गाइड’ हा चित्रपट ज्यावेळी त्यांच्याकडून तयार करण्यात आला, त्यावेळी तो अनेक प्रेक्षकांच्या पसंतीला देखील त्याचबरोबर त्यांनी फिल्म दुनियातील एक वेगळी ओळख त्या चित्रपटातून लोकांना करून दिली. त्यामुळे त्यांना गाईट सिनेमासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर आनंद घराण्याचं सिनेमा क्षेत्रात एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं कारण त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांना चांगले योगदान दिले होते. त्याचबरोबर त्यांनी चांगले सिनेमे दिल्याने त्याचं सर्वच स्तरातून कौतुक देखील होऊ लागलं. 90 दशकात विजय आनंद यांनी एक भूमिका साकारली होती, ती देखील लोकांना त्या काळात अधिक आवडली होती. त्यांच्या करिअर काळात एक असा दिवस आला होता, की त्यांना देखील संघर्ष करावा लागला होता.

अमृता फडणवीसांचे शिव तांडव स्त्रोत्र येतय; सोशल मीडियावर शेअर केला संगीतमय अनुभव

जॉन अब्राहमचा पुन्हा एक अ‍ॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला ; तेहरानचे पोस्टर शेअर करुन म्हणाला मी…

कच्चा बदामच्या Reelनं फेमस झाली अंजली अरोरा! तिचा नवा Reel आलाय, पाहून म्हणाल, ‘आ रा रा रा….’