टीव्ही9 नेटवर्क त्यांच्या सर्वात मोठ्या कार्यक्रम ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2025) आज म्हणजे शुक्रवार 28 मार्च रोजी संपन्न होत आहे . या दोन दिवसांच्या कार्यक्रमात राजकारणापासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंतच्या मोठ्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. तसेच जनतेला संबोधित करणार आहेत. या यादीत दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याचही नाव आहे. तो विजय पथ ऑफ सिनेमा नावाच्या सेगमेंटचा एक भाग असणार आहे.
कार्यक्रमाचे खास पाहुणे आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
WITT च्या व्यासपीठावर अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित आहेत. देश आणि जगाबद्दल त्यांचे विचार मांडणार आहे. या कार्यक्रमाचे खास पाहुणे आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. याशिवाय, यामी गौतम, जिम शार्भ, अमित वैद आणि विजय देवरकोंडा यांसारखे मनोरंजन जगतातील कलाकार या कार्यक्रमाचा भाग आहेत. विजय देवरकोंडा स्टारडम नोज नो लँग्वेज सेगमेंटमध्ये विजयपथ ऑफ सिनेमा नावाच्या सत्रात सहभागी झाला आहे. विजय संध्याकाळी 6.40 वाजेपर्यंत कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
दोन प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेतेही कार्यक्रमत सहभागी
त्याच्याशिवाय, दोन प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते जिम शरभ आणि अमित साध स्टारडमच्या हायवे सेगमेंटचा भाग असणार आहेत. दोघेही त्यांच्या करिअर ग्राफबद्दल आणि सिनेमाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल बोलतील अशी शक्यता आहे. तर बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम इंडियाज गॉट टॅलेंट-नाऊ अॅट दी ग्लोबल स्टेज सेगमेंट अंतर्गत इंडियाज सिनेमा शक्ती सत्राचा भाग असणार आहे.
विजय देवरकोंडाची जगभरातील लोकप्रियता
दरम्यान दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडा जगभरात लोकप्रिय आहे. अर्जुन रेड्डी आणि लायगर सारख्या चित्रपटांमधून लोकप्रियता मिळवणारा विजय देवरकोंडा शेवटचा प्रभासच्या कल्की चित्रपटात कॅमिओ करताना दिसला होता. आता तो ‘किंगडम’ चित्रपटाचा एक भाग असणार आहे. या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर रश्मिका मंदान्नासोबतच्या त्याच्या प्रेमसंबंधांबद्दलही बऱ्याच चर्चा होतच असतात. पण त्यावर अजून काही भाष्य केलं नाही.