मुंबई : मागील वर्षात कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) जगभरातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. एक वर्षानंतरही अद्याप या जगाला कोरोना विषाणूपासून मुक्त करण्यात यश आलेले नाही. गेल्या वर्षी, 24 मार्च 2020मध्ये भारतात लॉकडाउन घोषित केला गेला होता. हा लॉकडाउन 2 महिन्यांहून अधिक काळ चालला आणि या वेळी बर्याच लोकांची एक वेळच्या अन्नाची देखील भ्रांत निर्माण झाली. त्या काळातील या मुद्द्यावर आता एक पत्रकार-चित्रपट निर्माते विनोद कापरी (Vinod Kapri) यांनी एक डॉक्यूमेंट्री केली आहे. या डॉक्यूमेंट्रीचे नाव आहे ‘1232 केएम’ (1232 KMS Trailer Out) आणि यात स्थलांतरित कामगारांच्या व्यथा चित्रित केल्या गेल्या आहेत (Vinod Kapri Documentary show based on lockdown 1232 KMS Trailer Out).
तब्बल 1232 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या घरी पोहोचणार्या 7 मजुरांच्या संघर्षावरून या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. विनोद कपरी यांनी या चित्रपटात बरेचसे मूळ फुटेज वापरले आहेत, म्हणून त्यास फीचर फिल्मपेक्षा डॉक्युमेंटरी फिल्म म्हणणे अधिक चांगले वाटते. चित्रपटात, हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या घरांमधून प्रवास करणाऱ्या या स्थलांतरित मजुरांचा प्रवास दाखवला जाईल. त्यांना या काळात किती कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला आणि कसे ते त्यांच्या घरी पोहोचले, तर त्यांच्यातील काही जण कधीच घरी पोहोचू शकले नाहीत, या संघर्षाची कहाणी यात दिसणार आहे.
(Vinod Kapri Documentary show based on lockdown 1232 KMS Trailer Out)
या माहितीपटात आपल्याला स्थलांतरित मजुरांची कहाणी पाहायला मिळेल. ज्यांनी दिल्ली ते बिहार हा प्रवास आपल्या सायकलने पूर्ण केला. जो मार्ग जवळपास 1000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या 7 प्रवाश्यांसह बरेच अंतर एकत्र पार केले आहे. ऑस्कर विजेता गुनित मोंगा आणि मेरल्टा फिल्म्स या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचे संगीत गुलजारच्या गीतांनी सजलेले आहे. तर, त्याला विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले आहे. त्याचवेळी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सुखविंदर सिंगचा आवाज देखील ऐकू येतो.
विनोद कापरी हे पत्रकार आहेत आणि बर्याच वृत्तवाहिन्यांमधील वरिष्ठ पातळीवर जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. यापूर्वी विनोद यांनी ‘मिस टनकपूर हाजीर हो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात ओम पुरी, अन्नू कपूर, रवी किशन, संजय मिश्रा आणि ऋशिता भट्ट सारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर त्यांनी लिहिलेला ‘पीहू’ हा चित्रपट देखील खूप चर्चेत होता. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित होती. आता त्यांचा ‘1232 केएम’ हा लघुपट 24 मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
(Vinod Kapri Documentary show based on lockdown 1232 KMS Trailer Out)
Mouni Roy Wedding | मौनी रॉय लवकरच अडकणार लग्न बंधनात, मंदिरा बेदीच्या घरी पार पडली बैठक!
Rakhi Sawant Biopic | आलिया की प्रियंका, कोण साकारेल राखीची भूमिका? ‘ड्रामा क्वीन’ने दिले उत्तर…