IPL 2024 : भर स्टेडियममध्ये अनुष्काने जोडले हात… विराट ठरला कारणीभूत ! काय झालं असं ?

| Updated on: May 13, 2024 | 1:30 PM

विराट कोहलीच्या आरसीबीने नुकताच दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना जिंकला. हा सामना आरसीबीसाठी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी खूप महत्त्वाचा होता. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही मैदानावर उपस्थित होती. सामना जिंकल्यावर अनुष्काची जी रिॲक्शन होती ती खूपच वेगाने व्हायरल झाली.

IPL 2024 : भर स्टेडियममध्ये अनुष्काने जोडले हात... विराट ठरला कारणीभूत ! काय झालं असं ?
Image Credit source: social media
Follow us on

सध्याच्या काळात देशभरात फक्त दोनच गोष्टींची जोरात चर्चा सुरू आहे. पहिली म्हणजे लोकसभा निवडणूक आणि दुसरी म्हणजे IPL. निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदन पार पडत आहे. तर आयपीएला हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. सर्व टीम्सच्या प्लेऑफमधील 1-2 मॅचेसच बाकी आहेत. त्यानंतर सीझनची अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू होईल. या सीझनमध्ये आत्तापर्यंत विराट कोहलीच्या आरसीबी संघाचा परफॉर्मन्स हा ठीक-ठाक होता. पण आता मागचा सामना जिंकून आरसीबी संघाने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. तरीही अन्य संघाच्या कामगिरीवरही या संघाचा प्लेऑफमधील प्रवेश अवलंबून असेल. पण एकंदर बघायला गेलं तर त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची आशा कायम आहे. आणि सगळे म्हणतात तसं… उम्मीद पर दुनिया भी कायम है ! अशा परिस्थितीत आरसीबीच्या कालच्या विजयाने चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चेहही देखील स्टेडिअममध्ये आली होती. पतीच्या संघाला मिळालेला विजय पाहून तिच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. त्याच दरम्यान तिने दिलेली एक रिॲक्शन वेगाने व्हायरल झाली आहे.

अनुष्काने भर स्टेडिअममध्ये जोडले हात

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. खुद्द आयपीएलच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आरसीबीच्या विजयाचे शेवटचे क्षण व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहेत. दरम्यान, अनुष्का शर्माचे एक्सप्रेशनही कॅमेऱ्यात कैद झाले आणि तो व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. सामना जिंकताच अनुष्का शर्माचा चेहरा उजळून निघाला. अतिशय आनंदी झालेल्या अनुष्काने एका खास शैलीत हा विजय साजला केला. सामना जिंकल्यावर सगळे जल्लोष करत असतानाच अनुष्काने मात्र भर मैदानात , सर्वांसमोरच हात जोडले. हात जोडून, कपाळाला लावत तिने या विजयासाठी देवाचे आभार मानले. विराटनेही त्याच्या प्रतिक्रियेचे कौतुक केले आणि तिच्याकडे बोट दाखवत आपला महत्त्वाचा विजय साजरा केला.

 

अकायच्या जन्मानंतर बऱ्याच काळाने अनुष्काने IPL मध्ये लावली हजेरी

फेब्रुवारी मध्ये अनुष्काने मुलाला, अकायला जन्म दिला. आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर काही काळ ती स्टेडिअममध्ये दिसली नव्हती, पण गेल्या काही सामन्यांपासून ती आरसीबीच्या मॅचच्या वेळेस चिअर करण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित असते. 2018 मध्ये अनुष्का ही झिरो या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती मुख्य अभिनेत्री म्हणून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तिच्याकडे सध्या चकदा एक्सप्रेस नावाचा एकच चित्रपट आहे.