मुंबई: ‘व्हॅलेंटाईन डे’च्या (Valentines day) दिवशी विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईकवरुन फिरणाऱ्या अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याच्यावर वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) नुकतीच कारवाई केली होती. विवेकला 500 रुपयांचे ई-चलान पाठवण्यात आले होते. तसेच मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात विवेक ऑबेरायवर गुन्हाही नोंदवण्यात आला होता. (Vivek Oberoi apologises to Mumbai Police)
यानंतर आता विवेक ओबेरॉय याने ट्विट करून आपल्या कृत्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. सुरक्षेची काळजी सर्वात प्रथम घेतली पाहिजे, याची जाणीव करुन दिल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभार. बाईकवरुन प्रवास करताना हेल्मेट आणि मास्क घाला, असे विवेक ओबेरॉयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’ला विवेक ओबेरॉयने बाईकवरुन पत्नीसोबत सैर केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात विवेकने हेल्मेट घातलेले नव्हते, तसेच चेहऱ्याला मास्कही लावला नव्हता. विवेक ओबेरॉयने बाईक राईडचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्याखाली त्याने कॅप्शनही दिलं होतं. ‘व्हॅलेंटाइन डेची मस्त सुरुवात… मी, माझी बायको आणि ती… रिफ्रेश करणारी जॉयराईड’ अशा आशयाचं कॅप्शन विवेकने दिलं होतं.
विवेकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले. विवेकने हेल्मेटविना बाईक चालवून वाहतूक सुरक्षा नियम मोडला आहे. तसेच मास्क न घातल्याने तोही नियमभंग ठरतो. युवा पिढीसमोर चुकीचा संदेश जात असल्याचं वर्गीस यांनी लिहिलं होतं.
Pyaar humein kis mod pe le aaya!Nikle they nayi bike par hum aur hamari jaan, bina helmet ke kat gaya chalaan!Riding without a helmet?Mumbai police will do a checkmate!Thank u @mumbaipolice for making me realise that safety is always most important. Be safe,Wear a helmet & a mask
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) February 20, 2021
वर्गीस यांच्या या ट्विटची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. त्यानंतर विवेकवर गुन्हा दाखल करण्यात आला. विवेकला 500 रुपयांचं चलानही मोबाईलवर पाठवण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
सँडल वुड ड्रग्जप्रकरणी मोठी कारवाई, विवेक ओबेरॉयच्या मेहुण्याला अटक
(Vivek Oberoi apologises to Mumbai Police)