बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे चित्रपटापेक्षाही इतर व्यवसायांनी जास्त कमाई करतात. चित्रपटांनंतर त्यांचा असणारा बॅकअप आणि स्ट्रॉंग प्लॅन म्हणजे ते करत असलेले व्यवसायचं असतात. असाच एक अभिनेता आहे ज्याने अभिनयापेक्षाही व्यवसायांमधून कमाई जास्त केली आहे. विवेक एका व्हिडिओद्वारे व्यवसाय आणि कमाईची म्हणजेच आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी नक्की काय केलं याबाबत सांगितले आहे. तो स्वत:देखील याच टिप्स फॉलो करतो.
अनेक यशस्वी व्यवसायांतून गुंतवणूक
विवेक ओबेरॉय चित्रपटसृष्टीत फारसा सक्रिय नसला तरी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांची गणना होते. अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती 1200 कोटी रुपये आहे.
अभिनयाव्यतिरिक्त, तो अनेक यशस्वी व्यवसाय चालवतो. तसेच तो त्याच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या टिप्ससाठी देखील प्रसिद्ध आहेत. त्याने अनेक व्हिडिओंमध्ये लोकांना बचत आणि गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वपूर्ण सल्ले दिले आहेत.
विवेक ओबेरॉने वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट बचत करा, उत्पन्नानुसार खर्च करा आणि बचत तीन ते पाच वर्षे टिकवा असा सल्ला त्याने दिला आहे. एवढच नाही तर एफडी किंवा सरकारी योजनांचा कसा उपयोग करून घ्यायचा याबद्दलही तसेच यांपैकी सुरक्षित गुंतवणूक कशी करावी हे सर्व त्याने सांगितले आहे.तर, पाहुयात विवेकनं दिलेल्या त्या 5 महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत?
तुमची बचत तिप्पट करा
विवेक ओबेरॉयने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, एखाद्याने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट बचत केली पाहिजे. ही बचत तुमच्यासाठी जेव्हा अचानक काही कठीण वेळ येते, जसे की तुमची नोकरी गमावणे किंवा एखादा आजार उद्भवणे. अशा प्रकरणात तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही अशा प्रसंगांना तोंड देऊ शकता.
उत्पन्नानुसार खर्च करा
खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचं असून आपण आपल्या उत्पन्नानुसार खर्च केला पाहिजे अस विवेकने सांगितले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार जेवढे कमावले तेवढे खर्च करा आणि अनावश्यक खर्च टाळा.
तीन ते पाच वर्षे टिकणारी बचत करा : विवेकने सल्ला देतात सांगितलं की आपत्कालीन परिस्थितीत किमान तीन ते पाच वर्षे खर्च भागेल एवढी तुमची बचत इतकी मजबूत असली पाहिजे. सुरक्षित आणि स्थिर गुंतवणुकीलाच आधी प्राधान्य द्या असही त्याने सांगितले.
सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य द्या
विवेक ओबेरॉय सल्ला देताना म्हणाला की, आपण सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूकीची निवड केली पाहिजे. जसे FD,सरकारी योजना किंवा बॅंकांच्या योजना असतील तर अशा पर्यायांमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर असल्याचं त्याने म्हटलं. तसेच जास्त नफ्याचे आश्वासन देणारे अन् पैसे गमावण्याची शक्यता असलेले धोकादायक पर्यायांमध्ये पैसे गुंतवणे टाळले पाहिजेत असंही त्याने सांगितले.
गुंतवणूक करण्यापूर्वी स्त्रोत तपासा
गुंतवणूक करण्याआधी स्रोतांची पडताळणी करणं महत्त्वाचं असल्याचंही विवेकनं म्हटलं. फक्त कंपनीची अधिकृत वेबसाइट, सरकारी अहवाल किंवा आर्थिक तज्ञांच्या सल्लेही पाहा. जर सोशल मीडियावर एखाद्याने शेअर्सचे वर्णन करून त्यातून तुम्हाला लगेच फायदे मिळतील असं जर काही सांगण्यात आलं असेल तर त्याची पडताळणी केल्याशिवाय गुंतवणूक करू नका असंही त्यांनी म्हटलं आहे.
निर्णय घेताना विचार करा
विवेक म्हणतो की योग्य माहिती मिळवून आणि विश्वासार्ह स्त्रोत तपासल्यास गुंतवणुकीचे जोखमीपासून दूर राहू शकतो आणि चांगले आर्थिक निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे निर्णय घेताना विचार करणं फार महत्त्वाचं असल्याच विवेक म्हणाला. विवेकनं सांगितलेल्या या टिप्स प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता मिळवण्यात मदत करू शकतात हे नक्की.