कोरोना परिस्थितीमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या सगळे चित्रपट प्रदर्शित करण्यात येत आहेत. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. अशा परिस्थितीत आपण ओटीटीवर रिलीज झालेल्या क्राइम संबंधित (Crime) 5 चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या चित्रपटांचा तुम्ही लॉकडाउनमध्ये आनंद घेऊ शकता.
2021 मध्ये रिलीज झालेला जोजी हा एक क्राइम ड्रामा आहे. जो नुकतंच प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
मिसेस सीरियल किलरची कहाणी उत्तराखंडजवळची दाखवण्यात आली आहे. जिथे मुली सतत गायब होत असतात. या चित्रपटात मोहित रैना, मनोज बाजपेयी, जॅकलिन फर्नांडिज मुख्य भूमिकेत आहेत.
दृश्यमचा सिक्वेल दृश्यम 2 नुकतंच रिलीज झाला आहे, या चित्रपटात आपण मोहनलाल यांना पाहिलं होतं. कोरोना परिस्थीतीमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही त्यामुळे तो थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांचा सुंदर चित्रपट ‘रात अकेली है’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.
लॉकडाऊनमुळे अनुराग कश्यपचा चोक्ड हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करावा लागला. हा चित्रपट देखील एक अद्भुत कथा आहे. ज्यामध्ये एका कुटूंबाला त्यांच्या किचनमध्ये कोट्यावधी रुपये मिळतात.