“त्यांनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर…” ऐश्वर्या अभिषेकला लग्न टिकवण्यासाठी काजोलने कोणता सल्ला दिला होता? 

| Updated on: Dec 07, 2024 | 2:08 PM

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना काजोलचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओमध्ये ती लग्न टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्याला एक सल्ला देताना दिसत आहे.

त्यांनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर... ऐश्वर्या अभिषेकला लग्न टिकवण्यासाठी काजोलने कोणता सल्ला दिला होता? 
Follow us on
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आजही सुरु आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल काहीना काही अपडेट येतच असतात.  दोघे लवकर विभक्त होणार असल्याच्या बातम्या समोर येत असल्या तरी त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यातच अभिषेक आणि निमरत कौरविषयी देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा आल्याचे म्हटले जाऊ लागले.
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाबद्दलच्या चर्चांनंतर त्यांचे अनेक जुने फोटो, त्यांना सोशल मीडियावर शेअर केलेले पोस्ट, त्यांच्या मुलाखती, किंवा त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियीवर आता व्हायरल होताना दिसत आहेत. इतकंच नाही तर अभिषेक आणि ऐश्वर्या रायच्या लग्नाचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
नात टिकवण्यासाठी काजोलचा सल्ला
अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओत अभिनेत्री काजोलनं या दोघांनाही लग्न टीकवण्यासाठी सल्ला देताना दिसत आहे. हा व्हिडीओ कॉफी विथ करण कार्यक्रमाचा 2007 मधला आहे. त्यात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी आले होते.
यावेळी रॅपिड फायर राउंड दरम्यान, काजोल ऐश्वर्या आणि अभिषेकला लग्न टिकवून ठेवण्यासाठी काय सल्ला देणार? असा प्रश्न करणने विचारला होता त्यावर काजोलनं सांगितलं की ‘या जोडप्यानं कधीच ‘कभी अलविदा ना कहना’ हा चित्रपट पाहू नये.’
‘एक्स्ट्रा मैरिटल अफेयर’वर आधारित चित्रपट न पाहाण्याचा सल्ला
‘कभी अलविदा ना कहना’ असा एक चित्रपट आहे ज्यात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, प्रीति झिंटा आणि अमिताभ बच्चन हे कलाकार आहेत. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारीत आहे. त्यामुळे काजोलच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की लग्न टिकवण्यासाठी, नाते टिकवण्यासाठी अशापद्धतीचा चित्रपट किंवा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्रा मैरिटल अफेयर न करणे.
काजोलने देखील हा सल्ला खेळाचा एक भाग म्हणूनच दिला होता. मात्र अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाबद्दलच्या चर्चांदरम्यान आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहे.