अमिताभ बच्चन… गेल्या अनेक दशकापांसून हिंदी चित्रपटसृष्टीवर दमदार आवाज आणि खणखणीत अभिनयाने राज्य करणारा अभिनेता. बिग बींचा चाहता नाही, असा एखादा माणूस विरळाच असेल. त्यांनी सेकंड इनिंगला सुरूवात करताना एक से एक दमदार भूमिका केल्या. मोहोब्बते, ब्लॅक, कभी खुशी कभी गम, पा, बंटी और बबली.. एक ना अनेक जॉनर्सच्या फिल्म्स त्यांनी केल्या. आजच्या घडीला वयाची 80 वर्षे ओलांडूनही बिग बी हे सर्वात व्यस्त अभिनेते आहेत.
त्यांच्या अभिनयाची तर सर कोणालाच नाही. पण ते केव अभिनय करत नाहीत तर एखादी भूमिका करण्यासाठी त्यांचं सर्वस्व देतात, अक्षरश: त्यांचा जीव भूमिकेत ओततात. एखादी भूमिका जिवंत करण्यासाठी ते कितीही प्रयत्न करू शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांच्या अशाच एका भूमिकेंमुळे त्यांच्या घरच्यांना मात्र विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला होता, कारण त्या भूमिकेसाठी बिग बी हे त्यांच्या घरातल्यांशी तीन दिवस बोलले नव्हते, त्यांनी सगळे संबंधच तोडले होते. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे. चला जाणून घेऊया असं नेमकं काय घडलं होतं ते..
निखिल अडवाणीने केला खुलासा
2001 साली आलेला कभी खुशी कभी गम हा बिग बी यांचा चित्रपट खूप गाजला. मल्टीस्टारर असलेल्या या चित्रपटात अमिताभ यांनी एका कठोर वडिलांची भूमिका साकारली होती. जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करीना कपूर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. मात्र या चित्रपटातील अमिताभ यांची वडिलांची भूमिका खूप गाजली, मात्र त्या चित्रपटातील एक सीनसाठी, संवादासाठी अमिताभ यांनी असं काही केलं ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाबी.
रेडिफला दिलेल्या मुलाखतीत निखिल अडवाणीने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाशी निगडीत किस्सा सांगितला. त्या चित्रपटात एक होता, जेव्हा शाहरूख हा त्याच्या वडिलांच्या मर्जीविरुद्ध काजोलशी लग्न करतो आणि घरी येतो. तेव्हा रागावलेले त्याचे वडील (अमिताभ बच्चन) त्याला बरंच काही सुनावतात आणि ‘तू माझा मुलगा असू शकत नाहीस’ अशा स्वरुपाचा संवाद त्यांच्यात घडतो. मात्र हा संवाद अमिताभ यांनी एवढा स्वाभाविकपणे म्हटला की तो ( खरा समजून) लोकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले होते. पण यासाठी अमिताभ यांनी स्वत:ची खूप तयारी केली होती, असे निखिल अडवाणीने सांगितले.
घरच्यांशी बोलणं केलं बंद
हा सीन खराखुरा वाटावा, त्यात अभिनय केलेला वाटू नये यासाठी अमिताभ बच्चन यांनी कसून तयारी केली, त्यांनी त्यांच्या घरातील सर्वांशी बोलणे बंद केलं होतं. चित्रपटातील हा राग अमिताभ हे प्रत्यक्षात जगले होते. त्यामुळेच आजही लोकांना हा सीन अगदी खरा वाटतो, त्यांच्या अजूनही तो लक्षात आहे. नैसर्गिकरित्या अभिनय करणे हे प्रत्येकालाच जमत नाही. मात्र त्यांच्या या अभिनयाची झळ घरच्यांना बसली होती, कारण घरात कोणाशीचे ते तीन दिवस बोलले नाहीत. जेव्हा त्यांनी जया बच्चन यांना त्याबद्दल सांगितले तेव्हा त्या म्हणाल्या – निखिल, तुला काहीच माहिती नाही, आम्हाला तीन दिवस अमितजींचे मौन सहन करावं लागलं.
करण जोहरने दिग्दर्शित केलेला’कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट 2001 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत शाहरुख खान, हृतिक रोशन, जया बच्चन, करीना कपूर आणि काजोल देखील होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटातील करिनाचा पू हिचा सीनही हिट झाला होता. वो कौन है जिसने पू को पलट कर नहीं देखा, हा तिचा संवाद खूप लोकप्रिय झाला होता.