मुंबई : बॉलीवूडचे हीमॅन , अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra ) हे त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासहच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. त्यांचे स्वतःचे आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हते. धर्मेंद्र यांना त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरपासून (Prakash kaur) चार मुले झाली, तेव्हा ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी याही (Hema Malini) त्यांच्या प्रेमात बुडाल्या होत्या. धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांचा या नात्याला सक्त विरोध होता. धर्मेंद्र-हेमा मालिनी यांचे प्रेम पुढे वाढू नये यासाठी सर्व प्रयत्न करत होते. धर्मेंद्रच्या पालकांनी सेटवर उपस्थित राहून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासही सुरुवात केली होती.
मात्र तरीही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. मात्र असे करण्यापूर्वी धर्मेंद्र यांना त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी घटस्फोट दिला नाही. अशा परिस्थितीत दुसऱ्या लग्नासाठी धर्मेंद्र यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला होता.
हेमामालिनी कधीही पहिल्या घरी गेल्या नाहीत
या लग्नानंतर हेमा मालिनी कधीही धर्मेंद्र यांच्या पहिल्या घरी गेल्या नाहीत. लग्नानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींसोबत राहण्यासाठी दुसरे घर घेतले होते. लग्न केल्यानंतर हेमामालिनी यांनी कधीही धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची भेटही घेतली नाही. तसेच त्यांच्या मुलीही कधीच प्रकाश कौर यांच्या घराची पायरीही चढल्या नाहीत. फक्त एकदाच, ईशा देओलने हा नियम मोडला होता आणि तिने प्रकाश कौर यांचीही भेट घेतली होती.
ईशाने घेतली होती प्रकाश कौर यांची भेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा ईशा देओल धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना भेटली होती. धर्मेंद्र यांचा भाऊ अजित कौर हे खूपच आजारी होते आणि त्यांना धर्मेंद्रच्या दोन लहान मुली, ईशा आणि आहाना यांना भेटण्याची खूप इच्छा होती. त्यावेळी ईशा त्यांना भेटण्यासाठी धर्मेंद्र यांच्या पहिल्या घरी गेली होती.
ईशाला भेटून प्रकाश कौर यांची कशी होती रिॲक्शन ?
धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर जेव्हा ईशा देओलला भेटल्या, तेव्हा त्यांनी ईशाचे प्रेमाने स्वागत केले, आपुलकीने चौकशीही केली. नंतर ईशाचा सावत्र भाऊ आणि धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल यानेच काका, अजित याच्यासोबत ईशाची भेट घालून दिली होती.