Dharmendra | जेव्हा काजोलच्या आईने धर्मेंद्र यांना लगावली होती कानाखाली, म्हणाल्या बेशरम…

| Updated on: Jul 14, 2023 | 5:02 PM

धर्मेंद्र यांनी तनुजा यांच्याशी फ्लर्ट केल्यावर त्या भडकल्या. संतापलेल्या तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या कानाखाली मारत बेशरमही म्हटले होते.

Dharmendra | जेव्हा काजोलच्या आईने धर्मेंद्र यांना लगावली होती कानाखाली, म्हणाल्या बेशरम...
Follow us on

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (dharmendra)हे सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ते गेल्या पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांच्या उत्तमोत्तम चित्रपटांव्यतिरिक्त धर्मेंद्र हे अभिनेत्रींसोबत फ्लर्टिंगसाठी (flirting) देखील ओळखले जातात. त्याची फनी स्टाइल बहुतेक बॉलीवूड कलाकारांना माहीत आहे, पण धर्मेंद्रच्या या सवयीमुळे काजोलची आई, अभिनेत्री तनुजाने (tanuja)त्यांना एकदा कानाखाली मारली होती.

हे वाचून तुम्हीही हैराण झालात ना, पण हे खरं आहे. खुद्द तनुजा यांनीच हा किस्सा सांगितला होता. ‘ धर्मेंद्र यांनी जेव्हा माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी त्यांना सरळ बेशरम म्हटलं होतं, ‘ असं त्या म्हणाल्या. हा किस्सा ‘चांद और सूरज’ चित्रपटादरम्यान घडला होता, जेव्हा तनुजा या धर्मेंद्र व त्यांची पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत पार्टी करत होत्या.

काजोलच्या आईशी धर्मेंद्र यांनी केले होते फ्लर्ट

तनुजा म्हणाल्या , ‘धर्मेंद्र यांनी माझ्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. मी शॉक झाले आणि बेशरम म्हणत त्यांना कानाखाली मारली. मी त्यांची पत्नी प्रकाश कौरना ओळखते, तरीही त्यांनी (तिच्यासमोर) माझ्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर त्यांना आपल्या कृत्याची लाज वाटली आणि ते म्हणाले, ‘तनू, माझी आई, मला माफ करा. प्लीज, मला तुझा भाऊ मान !’ त्यानंतर तनुजा यांनी धर्मेंद्रच्या मनगटावर काळा दोरा बांधत त्यांना भाऊ बनवले.

माफीच मागितली

ही घटना घडली तोपर्यंत धर्मेंद्र यांच्या जीवनात हेमा मालिनी यांची एंट्री झाली नव्हती. धर्मेंद्र आणि तनुजा यांनी चांद और सूरज, मोहब्बत की कसम, बहारें फिर भी आएंगी, दो चोर आणि इज्जत यांसारख्या चित्रपटात काम केले. दोघांचीही जोडी रसिकांना खूप आवडली होती.

रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये दिसणार धर्मेंद्र

आता धर्मेंद्र बऱ्याच काळानंतर करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र जया बच्चनसोबत खूप दिवसांनी एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.