बच्चन कुटुंबाचा बॉलिवूडमध्ये चांगलाच दबदबा आहे. गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा करिश्मा दाखवणाऱ्या बच्चन कुटुंबाचे लाखो चाहते आहेत. अमिताभ, जया, अभिषेक, आणि ऐश्वर्याही, सतत चर्चेत असतात. कधी प्रोफेशनल कामांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे बच्चन कुटुंब नेहमीच लाईमलाइटमध्ये असतं.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून बच्चन कुटुंब वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघांमधील मतभेदाच्या, बेबनावाच्या बातम्या सतत समोर येत आहेत. त्यांच्यात काहीच आलबेल नाही अशी चर्चा आहे. गेल्या महिन्यात अंबानी कुटुंबाच्या लग्नसोहळ्यासाठी देखील संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं, त्यात श्वेता बच्चन आणि तिच्या मुलांचाही समावेश होता. पण सूनबाई ऐश्वर्या आणि आराध्या या काही त्यांच्यासोबत आल्या नाहीत. उलट त्या दोघांनी नंतर, वेगळी एंट्री केली.. ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि पुन्हा चर्चा सुरू झाल्या.
अभिषेकच्या लाईकमुळे चर्चांना उधाण
त्यानंतर काहीच दिवसांनी अभिषेक बच्चन याने घटस्फोटाबद्दलच्या एका आर्टिकलची पोस्ट लाईक केली आणि त्यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले. नंतर त्याला एका रिपोर्टरने लग्नाबद्दल सरळ प्रश्न विचारल्यावर त्याने थेट त्याची लग्नाची अंगठी दाखवत आपल्यात (नात्यात) सर्व काही आलबेल असल्याचा इशारा केला.
एअरपोर्टवर अभिषेक त्या दोघींसोबत दिसला, पण…
मात्र बऱ्याच काळापासून अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या काही एकत्र दिसले नाहीत. नुकताच तो एअरपोर्टवरील देखील स्पॉट झाला. त्याने ब्लॅक कलरची पँट आणि ग्रे स्वेटशर्ट घातला होता. तेव्हा त्याच्यासोबत आई जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन या दोघी देखील दिसल्या, पण आराध्या-ऐश्वर्या कुठेच नव्हत्या. जया यांनीही ग्रे रंगाचा ड्रेस घातला होता आणि श्रगही कॅरी केला. तर शअवेता बच्चन ही ब्लॅक पँट आणि लाइट कलरच जॅकेट घालून दिसली. मात्र त्यांचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी पुन्हा प्रश्नांचा भडिमार करत ऐश्वर्याबद्दल विचारणा केली.
अनेकांनी तर वेगवेगळ्या कमेंट्स करत जया आणि श्वेता बच्चन या दोघांनाही ट्रोल करत त्यांना दोषी ठरवले. श्वेता बच्चनमुळेच अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र बच्चन कुटुंबियांनी यावर अद्याप कोणीतीही प्रतिक्रिया न देता मौन राहणंच पसंत केलं आहे.